Monday, June 28, 2021

अर्बन बॅंक घोटाळा प्रकरणी तीन डॉक्टरांच्या खात्यांची चौकशी सुरूअर्बन बॅंक घोटाळा प्रकरणी तीन डॉक्टरांच्या खात्यांची चौकशी सुरू

नगर दिनांक 27 

नगर अर्बन बँकेच्या 22 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नगर येथील तीन डॉक्टरांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या बँकेच्या खाते उताराची व अन्य बाबींची पडताळणी सुरू केले असल्याची माहिती पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.


पोलिसांनी डॉक्टर विनोद श्रीखंडे, डॉक्टर रवींद्र कवडे, डॉक्टर भास्कर सिनारे यांना अटक केलेली आहे.


नगर अर्बन बँकेच्या पुणे येथील चिंचवड शाखेमध्ये 22 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्याच्या पथकाने आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केलेली आहे. यामध्ये आशुतोष लांडगे यांच्या खात्यामध्ये अकरा कोटी रुपये वर्ग झाले होते. त्याचा तपास करत असताना या तीन डॉक्टरांची नावे निष्पन्न झालेली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन दिवसापूर्वी नगर येथील  डॉक्टरांना ताब्यात घेऊन सुरुवातीला त्यांची प्राथमिक चौकशी नगर येथे केली व त्यानंतर पुणे येथे अटक केली. डॉक्टरांना दिनांक 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.


पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने डॉक्टरांच्या खात्याची पडताळणी सुरू केलेली आहे. अनेक कागदपत्रं त्यांच्याकडून हस्तगत केलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कोणी व केव्हा टाकले, या मागचा उद्देश काय होता, याची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच अन्य कुणाच्या नावावर अजून कुठे कुठे खाते आहेत, याची सुद्धा माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता यांच्या खात्यातून कशा प्रकारची माहिती पोलिसांच्या हाती लागते, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. दरम्यान या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना अटक झाली. मात्र दुसरीकडे नगर येथे याच बँक घोटाळ्यातील गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या पकडलेल्या डॉक्टरांना नगरच्या या गुन्ह्यांमध्ये वर्ग करता येईल का, या दृष्टिकोनातून येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने तयारी सुद्धा सुरू केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only