Thursday, June 10, 2021

रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्पाची सक्ती करणार : मंत्री जावडेकररुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्पाची सक्ती करणार : मंत्री जावडेकर


नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली नवा भारत घडविताना प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा मानस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. रुग्‍णालयातील बेडच्‍या संख्‍येनुसार ऑक्सिजन प्रकल्‍पाची सक्‍ती करण्‍याचा नियम सरकार लवकरच करणार असल्‍याचे सुतोवाचही त्‍यांनी केले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनमध्‍ये कार्यान्वित झालेल्‍या स्‍वयंपूर्ण अशा देशातील पहिल्‍या ऑक्सिजन प्रकल्‍पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍या हस्‍ते व्‍हर्चुअल रॅलीच्‍या माध्‍यमातून झाले. प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज इंदुरीकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झालेल्‍या या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, डॉ विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे, समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर, शालिनी विखे, डॉ. सुप्रिया ढोकणे-विखे, ॲड. वसंतराव कापरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जावडेकर म्‍हणाले, "‍कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्‍या त्रुटी प्रामुख्‍याने दिसून आल्‍या त्‍यामध्‍ये ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ही समस्‍या  सर्वांनाच भेडसावली. अनेक रुग्‍णालयात ऑक्सिजन प्रकल्‍प नाहीत, हे प्रामुख्‍याने जाणवले. त्‍यामुळेच ऑक्सिजनची उपलब्‍धता करणे हे मोठे आव्‍हान बनले. संकटाच्‍या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्‍धता केली." डॉ. विखे पाटील फाउंडेशनने कार्यान्वित केलेला ऑक्सिजन प्रकल्‍प ही एक चांगली सुरुवात असून, हा स्‍वयंपूर्ण प्रकल्‍प असल्‍याने टॅंकरची वाट पाहावी लागणार नाही. भविष्‍यात हॉस्पिटलमध्‍ये असलेल्‍या बेडच्‍या संख्‍येच्‍या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्‍प उभारण्‍याचा नियम सरकार करेल, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only