Sunday, June 27, 2021

विकासासाठी आम्ही कोणा बरोबरही जाऊ शकतो-खा डॉ विखेची स्पष्ट भूमिका नगर दिनांक 27 प्रतिनिधी 


आम्ही राजकारण करत नाही, नगर दक्षिणेचा व नगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन कोणाशीही आघाडी करायला तयार आहोत. पण ही आघाडी आमच्या स्वार्थासाठी नाही, जनतेच्या हितासाठी आहे एवढेच मला यातून सांगायचं आहे, असे वक्तव्य खासदार डॉ सुजय विखे यांनी रविवारी येथे केले.


महानगरपालिकेच्या माध्यमातून अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा

आढावा घेण्यासाठी आज येथील माऊली सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप , भाजप माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष भय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर  मालन ढोणे, आदी यावेळी उपस्थित होते.


खासदार विखे म्हणाले की , शहरात अनेक विकास कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना त्या वेळेला आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला ही वस्तुस्थिती आहे, आम्ही अडीच वर्षांचा कार्यकाळ यामध्ये कामे केली, ती आता जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे नगर शहराचे प्रलंबित असलेली अमृत योजना असेच भुयारी गटार योजना, नगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय आम्ही आमच्या कार्यकाळा मध्ये मार्गी लावू शकलो असेही ते म्हणाले, अमृत योजनेचे काम झाल्यामुळे नगर शहराला 24 तास पाणी आता मिळणार आहे, लवकरच ही योजना पूर्णत्वाला जाईल असे ते म्हणाले. या योजनेचे साधारण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, या योजनेअंतर्गत 36 किलोमीटर पाइप लाईन टाकायची होती ती  टाकून 

 उद्घाटन मागच्या आठवड्यात केलं होतं. आता 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले,  शेतकरी विरोध होता,त्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी काम पूर्ण केले आहे. रेल्वे विभागाच्या अडथळा होता तो सुद्धा दूर करून अमृत पाणीपुरवठा योजना मार्गी लावली, पुढच्या सहा महिन्यात ही योजना पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, यामुळे नगर शहराला पुढचे पंधरा वर्षे चोवीस तास पाणीपुरवठा अबाधित राहील असे ते म्हणाले.


घनकचरा चा सुद्धा विषय नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होता, स्वछता रँकिंगमध्ये महानगर पालिका 274 नंबर होती  कॉम्पिटिशन मध्ये आपण सहभागी होतो, कचरा कुंडी मुक्त शहर, घंटा गाडी द्वारे कचरा संकलन यामुळे देशात  40 नंबर वर आलो आहे, 3 स्टार मिळाल्यावर त्याच्या मध्ये सगळ्यात मोठे योगदान होतं ,साधारण याच्यामध्ये आता घंटागाडी द्वारे प्रत्येक घरावर जाऊन आपण त्याला गोळा करतोय, कुठे कचराकुंडी मध्ये कचरा साठत नाही , छोट्या गाड्या आपण त्यासाठी घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

 खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे आगामी काळामध्ये ज्यांची सत्ता आहे त्याच्या माध्यमातून ही योजना कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केला जाईल असेही खासदार विखे म्हणाले

कचऱ्यातून बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करता येते का हे पाहिले जाणार आहे, असे ते म्हणाले.  


अमृतचे काम झालेलं नव्हतं. अडीच वर्षांमध्ये 12 किलोमीटर 90 टक्के काम पूर्ण झालेला आहे.  या पाण्याच्या माध्यमातून नगर तालुक्याच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी देता येते का? यासाठी प्रयत्न करणार आहोत. पुढील सत्ताधारी यांनी लवकरच योजना पूर्ण करतील.


नगर शहराचा उड्डाणपुलाचा  प्रश्न मार्गी लावला. महानगरपालिकेच्या  माध्यमातून जमीन भूसंपादन करायचे होते. पाच महिन्याच्या कालावधीमध्ये 55 टक्के काम झाल. राज्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये काम होणारे ते पहिले काम असेल, असे ते म्हणाले. पुढच्या कामासाठी 17 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदारांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून जर हा निधी आणला तर उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे ते म्हणाले.


एक खासदार या नात्याने पक्षात नवा होतो, नगर जिल्ह्याने स्वीकारलं. आमदार माझ्या विरोधात  निवडणूक लढवून देखील आम्ही एकमेकांशी चर्चा करु शकलो, नगर शहराच्य कामासाठी आमची मैत्री झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी एकत्र राहिले, एकत्र येवून कामे मार्गी लावली, तर नगर शहराच्या नागरिकांना कुठल्याही गोष्टीसाठी कोणाचाही दारात जावे लागणार नाही, हाच या आघाडीच्या उद्देश आहे. महाराष्ट्र मध्ये कोणाचे सरकार सरकार आहे, किती वरती भांडत आहे, पण माझा व्यक्तिगत प्रश्न आहे ,आम्ही वरती पण सांगतो की, जे काही सहकार्य आपण आम्हाला देत आला आहात, या पद्धतीचा आशीर्वाद आणि सहकार्य ठेवा.


आमदार  संग्राम जगताप म्हणाले की,  महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांचा निधीतुन कामे केली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये नगरच्या राजकारणामध्ये अनेक विकासकामांना खोडा घालण्याच

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only