Thursday, June 17, 2021

बलात्काराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिसांनी केली अटकबलात्काराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिसांनी केली अटक


नगर दिनांक 17 प्रतिनिधी 


तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये  दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये फरार व निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने आज नाशिक येथे मोठ्या शिताफीने पकडले , अशी माहिती तोफखाना पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी दिली.


घटनेची माहिती अशी की ,संबंधित पिडीत महिलेने मला सिव्हील हस्पिटलचे मागे लाकडी दांडक्याने विकास वाघ यांनी डोक्यात मारले व हातावरती देखील मारले. माझा गळा दाबुन मला रस्त्यात आडवे पाडुन जिवे संपविण्याचा प्रयत्न केला, असे त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हणाले आहे.


विकास वाघ यांनी मला सांगितले की, तु माझ्यावरती दाखल केलेला गुन्हा मागे घे व मी पण तुझ्यावरती दाखल केलेले गुन्हे मागे घेतो, असे बोलत असताना विकास वाघ मला म्हणाले की, तु मी सांगतो तसा जबाब लिहून दे. तेव्हा मी त्यांना म्हणाले की, मी असा जबाब देवून शकत नाही त्याचा त्यांना राग आला.  मला बोलवून मिस्कीन मळा येथे रात्री 10/30 वा सुमारास झाडीत घेवुन गेले आणी त्यांनी माझे वरती जबरदस्तीने परत अत्याचार केला .


तसेच विकास वाघ यांचा हायकोर्टातुन जामीन झाल्यानंतर त्यांनी माझ्या विरुध्द हनीट्रपशी नाव जोडुन अनेक संबंधीत पत्रकाराना हाताशी धरून माझी बदनामीकारक बातम्या छापण्यास सुरूवात केली. त्यांचे अनैतिक संबंध असल्याने अफरोज शेख या महीलेला पुढे करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. 


मी बदनामीस वैतागुन आत्महत्येशीवाय दुसरा पर्याय नसल्याने तसेच माझी घरची परिस्थीती व माझ्या मुलाकडे व आईकडे पाहण्यास कोणीही नसल्याने व मला कायदयाचे ज्ञान नसल्याने घाबरून विकास वाघ सांगतील ते ऐकण्यास तयार झाले. मी हतबल झाले होते. मी त्यांच्या सांगण्यावरून हवे तसे प्रतिज्ञापत्र दिले. त्यावेळी मला आरती वाघ हिने प्रतिज्ञापत्र दे नाहीतर तुला जिवे संपवू, व विकास वाघ यांचे त्रासाला कंटाळुन मी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दिलेली फिर्यादी बाबत त्यांनी माझ्याकडुन प्रतिज्ञापत्र दिले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.


वाघ याची पत्नी आरती वाघ कायम मला केस मागे घे, तुझा खुन करेल अशी धमकी देत होती. विकास वाघ यांने माझ्या गळ्यातील दोन तोळयाचे मंगळसुत्र जबरदस्तीने काढून घेतले आणि 60,000 रु. रोख रक्कम वकीलाचे पैसे भरायचे आहे असे सांगुन घेतले होते. तसेच जबरदस्तीने मला एका कागदावरती काही मजकुर लिहून घेवुन त्याचे विकास वाघ यांनी त्यांचे मोबाईल फोन मध्ये रेकर्ड केले. आता जर तक्रार केली, तुझ्या कडे बघून घेईल असे म्हणत धमकावले होते व माझ्यावरती अत्याचार केले. माझी समाजामध्ये प्रतिमा खराब करून त्यांनी त्यांचे पदाचा गैरवापर करून माझ्यावरती वारंवार अत्याचार केल्याचे तिने तिथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.   


गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश दिल्या नंतर तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेत नाशिक येथे वाघ याला पकडत असताना पोलीस आणि वाघ याच्यामध्ये झटपट झाली.


निलंबित असलेला वाघ हा गेल्या तीन महिन्यापासून फरार होता. तो नाशिक येथे असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे यांच्यासह त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील, अविनाश वाकचौरे, सचिन जगताप यांच्या पथकाने नाशिक येथे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचून आज सकाळी त्याला पकडले. तोफखाना पोलिसांनी वाघ याला अटक केली असून न्यायालयात हजर करन्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.


चौकट

वाघ याला पकडायला तोफखाना पोलिसांचे पथक गेले असता, वाघ यानेच त्याच्या घरातील मौल्यवान साहित्य स्वतःच समोर फेकले. एकप्रकारे नगरचे पोलीस माझ्या घरी चोरी करायाला आले, असा बनाव तयार केला, व आता त्याचाच आधार घेत वाघ हा तक्रार करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only