Saturday, June 12, 2021

वश्‍वजित कासार टोळीविरोधात दोषारोपत्र दाखल मोक्का कायद्यांतर्गत 10 जणांविरूद्ध दोषारोपवश्जित कासार टोळीविरोधात दोषारोपत्र दाखल

मोक्का कायद्यांतर्गत 10 जणांविरूद्ध दोषारोप


। नगर । दि.13 जून ।  येथील कुख्यात गुंड विश्‍वजित रमेश कासार याच्यासह टोळीतील नऊ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) एक हजार 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी येथील मोक्का विशेष न्यायालयात दाखल केले आहे.


विश्‍वजित कासार याच्याविरुद्ध नगर, पुणे, जालना जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. वाळकी येथील ओंकार भालसिंग यांच्या खूनप्रकरणात त्याचा समावेश आहे. त्यामुळे विश्‍वजित कासार याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. त्यात इंद्रजित रमेश कासार (वय 25), मयूर बापूसाहेब नाईक (वय 20), संकेत भाऊसाहेब भालसिंग (सर्व रा. वाळकी), सुनील फक्कड अडसरे (वय 26 रा. शेंडाळा, ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करंडे, ता. शिरूर कासार, जि. बीड), सचिन भांबरे (रा. खेतमाळीसवाडी, ता. श्रीगोंदे), भरत भीमाजी पवार (वय 26 रा. साकत, ता. नगर) व संतोष भाऊसाहेब धोत्रे (वय 26 रा. कारगाव, ता. आष्टी) यांचा समावेश आहे.पोलिसांनी विश्‍वजित कासार, सुनिल अडसरे, इंद्रजित कासार, मयूर नाईक, भरत पवार, संतोष धोत्रे यांना अटक केली असून, अन्य आरोपी पसार झाले आहेत.


सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. आर. जारवाल यांनी केला. यानंतर सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, मिथून घुगे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी अप्पर पोलीस महासंंचालक यांच्याकडून मंजुरी घेत विश्‍वजित कासार टोळीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only