Thursday, June 10, 2021

चोरीचे गुन्ह्यातील डंपर विकत घेणारा आरोपी ६,००,०००/-रु. किं. चे डंपरसह , स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ला अटक .नगर  दि 11 

चोरीचे गुन्ह्यातील डंपर विकत घेणारा आरोपी ६,००,०००/-रु. किं. चे डंपरसह , स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ला अटक केली आहे.आरोपी जावेद बिबन सय्यद यास अटक केली आहे.


दिनांक २५/११/२०१८ रोजीचे रात्री फिर्यादी  अजिंक्य बबन पवार, वय २४ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, भिंगार, .नगर हे त्यांचे मालकीचा ६,००,०००/- रु. किं. चा टाटा कंपणीचा डंपर नं. एमएच १६ एवाय ०८९० हा नगर-सोलापूर रोडवरील श्री. रणसिंग यांचे गोडावून जवळ उभा करुन घरी गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदरचा डंपर चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ९२८/२०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, नगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि  अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला डंपर शिंगवे नाईक येथे राहणारा जावेद सय्यद याचेकडे असून तो सदर डंपरचा विना नंबरचा वापर करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि  सोमनाथ दिवटे, पोना रवि सोनटक्के, शंकर चौधरी, पोका  रविन्द्र घुंगासे, प्रकाश वाघ, मच्छिन्द्र बर्ड, संदीप दरंदले अशांनी मिळून शिंगवे नाईक येथे जावून इसम नामे  जावेद बिबन सय्यद, वय - ३२ वर्षे, रा. शिंगवे नाईक, ता. नगर यांस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या डंपर बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे राहते घराचे बाजूला उभा करुन ठेवलेला ६,००,०००/-रु. किं. चा विना क्रमांकाचा, टाटा कंपणीचा, १६१३ मॉडेलचा डंपर समक्ष हजर केल्याने सदर डंपरची पाहणी केली असता तो वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेला डंपर असल्याची खात्री झाल्याने तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला.


वरील नमुद ताब्यात घेतलेला आरोपी जावेद बिबन सय्यद याचेकडे सदर डंपर बाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा डंपर हा संदीप वाखुरे, रा. माळी बाभूळगाव, ता. पाथर्डी व गणेश जाधव, रा. पाथर्डी यांचेकडून विकत घेतला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपी संदीप वाखुरे व गणेश जाधव यांचा पाथर्डी येथे जावून शोध घेतला असता आरोपी संदीप वाखुरे हा मिळून आला नाही. तसेच आरोपी गणेश जाधव हा पाथर्डी पो.स्टे. गुरनं. २०५/२०२१ भादवि कलम ३०२, ३६४ या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे.


आरोपी जावेद बिबन सय्यद यास मुद्देमालासह भिंगार कॅम्प पो.स्टे. ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पो.स्टे. करीत आहेत.


सदरची कारवाई  मनोज पाटील , पोलीस अधीक्षक, नगर, . सौरभ कूमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक,. विशाल दुमे , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, .नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only