Saturday, June 5, 2021

जिल्हा परिषदेत ’शिवराज्य’ दिनाची तयारी पूर्ण पालकमंर्त्यांच्या उपस्थितीत होणार जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवाचा शुभांरभ
जिल्हा परिषदेत ’शिवराज्य’ दिनाची तयारी पूर्ण

पालकमंर्त्यांच्या उपस्थितीत होणार जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवाचा शुभांरभ। नगर । दि.05 जून । छत्रपती शिवाजी महाराज यांनी दि.6 जुन 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे म्हणून स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला तोच हा दिवस शिवराज्यभिषेक दिन आहे. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शककर्ते ही झाले, तोच हा शुभदिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.अशा या भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुशंगाने अहमदनगर जिल्हा परिषद इमारत आवारात रविवार दि.6 जून रोजी शिवस्वराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येणार असून, सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्षे पूर्ण झालेने जिल्हा परिषदहीरक महोत्सव शुभांरभ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जीवनोन्नती अभियांनाअंतर्गत स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपींगसाठी साईज्योती ई मार्केट प्लेसचा देखील शुभारंभ होणार आहे.


या कार्यक्रमास जिल्ह परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतावराव शेळके, अर्थ, पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख, बांधकाम व कृषीचे सभापती काशिनाथ दाते, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, महिला बालकल्याणच्या सभापती मिराताई शेटे, मुख्य कार्यकाी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर, आदीसह सर्व खाते प्रमुख उपस्थित राहणार असल्याची आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only