Monday, June 21, 2021

कसरतीचा खेळ करणार्‍या बंजारा समाजाला किराणा किटचे वाटप आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त झिशान शेख मित्र मंडळाचा उपक्रम
कसरतीचा खेळ करणार्‍या बंजारा समाजाला किराणा किटचे वाटप


आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त झिशान शेख मित्र मंडळाचा उपक्रम


अहमदनगर प्रतिनिधी- कोरोच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये अनेकांचे रोजगार बुडाले आहे.अशातच गावोगावी फिरून कसरत करून कला सादर करून आपली उपजीविका भागवणाऱ्या बंजारा समाजावर सध्या कोरोनाच्या मुळे उपासमारीची वेळ आली अशातच अहमदनगर झिशान फ्रेंड सर्कल मित्र मंडळाच्या वतीने नगर-पुणे महामार्गावर बंजारा समाजातील नागरिकांना किराणा किटचे वाटप केले महिनाभर पुरेल इतक्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला अशी माहिती झीशान शेख यांनी दिली.

      नगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौक येथे बंजारा समाजाच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त  100 कुटूंबियांना किराणा किट चे वाटप करताना राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे साहेबान जाहगीरदार,पै.झिशान शेख गुलशनवाले,अजित कोतकर,तमीम शेख,पै.अमित गाडे,राहुल सांगळे,चांद शेख, पंकज मगर,भैय्या बोरुडे,हातीम शेख,बाबु शेख,बब्बू नवलानी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only