Saturday, June 5, 2021

दरोडा घालण्याच्या टोळीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केला पर्दाफाश पाच आरोपींना केली अटक

 नगर दि 5 प्रतिनिधी


मोक्याचे गुन्हयातील जामीनावर आलेल्या आरोपीकडुन पोलीस बतावणी करुन दरोडा घालणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन केला असून पाच आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.


आरोपी मध्ये  तोफीक सत्तर शेख वय ३५ वर्ष रा. काझीबाबा रोड,   साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन रा. पापाजलाल रोड, वार्ड नं.  श्रीरामपुर , जावेद मुक्तार कुरेशी बजरंगचौक, श्रीरामपुर , युसुफ उर्फ सोनु आजम शेख रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव , शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापुरवाले रा. श्रीरामपुर यांचा समावेश आहे अन्य दोन आरोपी फरार आहेत


दिनांक २७मे २०२१ रोजी   फिर्यादी श्रीधर जंगलू सोनवणे वय ३४ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. लजपतराय वाडी, एकलहरे, ता. श्रीरामपुर जि.नगर हे त्यांचे ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचे दोस्त मॉडेलची गाडी नं. एमएच-४२-एम-९४८२ ही मध्ये ४,९१,३२८/- रु. किमतीचे भंगार त्यात पितळ, तांबे, अॅल्युमिनीयम व स्टील असे  नगर येथे घेवून जात असतांना शनिशिंगनापुर फाट्याजवळ त्यांना एक पांढच्या इटीका गाडी मधुन ४ इमस येवुन त्यांनी सोनवणे यांना आडवुन आम्ही पोलीस आहोत अशी बातावणी करुन सोनवणे यांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली व त्यास बळजबरीने त्यांचेकडील इटीका गाडीत बसवुन त्यांचे अपहरन करुन त्यांना पुढे वरवंडी गावाचे शिवारात आडराणान नेवुन सोडून दिले होते, विभागाने राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार तसेच मोक्याचे गुन्हयात जामीनावर मुक्त असलेला  तोफीक सत्तर शेख रा. श्रीरामपुर याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी लागलीच सदरची बातमी हि पोलीस निरीक्षक  अनिल कटके यांना सांगीतली त्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकाने श्रीरामपुर येथे जावुन  यांचेसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्याच्यासाठी जास्त त्यांना अटक केली .


ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा रामगड, ता. श्रीरामपुर येथील आयशा टेर्डस, नावाचे भंगारवाला आरबाज मन्सुरी उर्फ पिंजारी यास विकेलेला आहे असे सांगीतले वरुन पथकातील अधिकारी व अमंलदार हे सदर ठिकाणी जावुन आरोपी  आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी वय १९ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर आरोपी  तोफीक सत्तर शेख वय ३५ वर्ष रा. काजीबाबा रोड, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अ.नगर, साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन वय २४ वर्ष रा. पापाजलाल रोड, वार्ड नं. २ श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अ.नगर , जावेद मुक्तार कुरेशी वय २४ रा. बजरंगचौक, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अ.नगर , शाम भाऊराव सांळुके वय २० रा. खटकळी, बेलापुर ता. श्रीरामपुर जि. अ.नगर  आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी वय १९ वर्ष रा. कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ, श्रीरामपुर ता. श्रीरामपुर जि.अ.नगर यांना मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील कारवाई राहुरी पो.स्टे. करीत आहे. या प्रकारामध्ये पकडलेला आरोपी तोफिक शेख याच्यावर 15 गुन्हे दाखल आहे तर साजिद मलिक मलिक याच्यावर सहा गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहे.


सदरची कारवाई  मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, दिपाली काळे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर,  संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई  गणेश इंगळे,  मनोज गोसावी, पोना सुरेश माळी, पोना विशाल दळवी, दिपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे,  आकाश काळे,  जालिंदर माने , उमाकांत गावडे यांचे एक स्वतंत्र पथक स्थापन केले होते. या पथकाने ही कारवाई केली आहे

 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only