Monday, July 26, 2021

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई ः 14 ठिकाणी छापे

 


जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई ः 14 ठिकाणी छापे


। नगर । दि.26 जुलै । नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक व जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयामध्ये अवैध धंद्याविरुध्द 14 ठिकाणी कारवाई करण्यात आली.14 ठिकाणी छापे टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 लाख 37 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी नगर जिल्हयातील अवैध धंद्याविरुध्द काराईची विशेष मोहिम राबवून दि.24 जुलै ते 26 जुलै चे दरम्यान, 14 ठिकाणी छापे टाकून 2 लाख 37 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये गावठी हातभट्टी तयार दारु, कचचे रसायन, भट्टीची साधने, देशी दारु जप्त केली.


देशी विदेशी दारु जप्त करुन 18 आरोपीविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शेवगांव, श्रीरामपुर शहर, राहूरी, श्रीरामपूर तालूका, तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वेय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only