Saturday, July 10, 2021

अर्बनमधील 23 कोटी कर्ज फसवणूक प्रकरण त्या तीन डॉक्टरांना 16 पर्यंत पोलीस कोठडीअर्बनमधील 23 कोटी कर्ज फसवणूक प्रकरण त्या तीन डॉक्टरांना 16 पर्यंत पोलीस कोठडी

नगर दिनांक 10 प्रतिनिधी


 नगर अर्बन बँकेच्या 22 कोटी 90 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणांमध्ये  आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या घटनेतील तीन डॉक्टरांना या गुन्ह्यांमध्ये वर्ग करून त्यांना अटक केली,  त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता दि, 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले  असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.


डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे.नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह पिंपरी येथील शाखे मध्ये जो अपहार झाला होता. या प्रकरणात  पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आठ आरोपींना अटक केली होती. यामध्ये वरील तीन डॉक्टरांचा  समावेश होता.  गुन्ह्यांमध्ये अकरा कोटी रुपये हे अशितोष लांडगे  याच्या खात्यातून या तीन डॉक्टरांच्या खात्यामध्ये सहा कोटी चार लाख रुपये वर्ग करण्यात आलेले होते.  त्यामुळे या डॉक्टरांच्या खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने आले तसेच या फसवणुकी मध्ये यांचा समावेश असल्यामुळे त्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्याच्या पथकाने अटक करून या प्रकरणांमध्ये त्यांना काल जामीन मिळाला होता.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणामध्ये संबंधित तीन डॉक्टरांचा समावेश असल्यामुळे त्यांना या गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार काल नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस  उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी आठ जणांचे पथक या तीन आरोपींना पकडण्यासाठी व त्यांना या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते काल रात्री त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आले आहे.


आज या तिन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता 22 कोटी 90 लाख रुपये कर्ज घेतले होते. ती रक्कम यांनी कुठेकुठे वापरली तसेच या प्रकरणासाठी जी जमीन तारण ठेवण्यात आली होती. त्याची विक्री केल्यानंतर  त्यापोटी एकूण 85 लाख रुपये त्यांनी कशासाठी वापरले आहेत. याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे यातील इतर आरोपींचा सुद्धा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद आज न्यायालयामध्ये करण्यात आला. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना दि. 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only