Tuesday, July 13, 2021

शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवातशहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात


महापालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमणांवर कारवाईला सुरूवात केली आहे. अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख अभियंता कल्याण बल्लाळ, प्रभाग अधिकारी दिनेश सिनारे यांच्या नेतृत्वाखाली वाडियापार्क येथून कारवाईला सुरूवात करण्यात आली.


वाडियापार्क परिसरात रस्त्यावर आलेले फळविक्रेते, हातगाडी व्यावसायिकांना हटविण्यात आले. त्यानंतर माळीवाडा वेस परिसरात कारवाई सुरू झालेली आहे. तसेच, मनपाच्या पथकाकडून आशा टॉकीज चौक परिसरातही कारवाई सुरू आहे. दुसर्‍या पथकाकडून औरंगाबाद महामार्गावरील जुन्या आरटीओ समोरील पाण्याच्या टाकीच्या परिसरात बांधण्यात आलेले पत्र्याचे गाळे व इतर अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेता पत्र्यांचे गाळे उभारुन व्यवसाय थाटण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी टपर्‍याही टाकण्यात आलेल्या आहेत. आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार या अनधिकृत टपर्‍या व पत्रा मार्केटवर कारवाईचे नियोजन सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई सुरू केली जात आहे. दरम्यान, शहरातील सुमारे दीड हजार पत्र्यांचे गाळे मनपाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only