Monday, July 26, 2021

भाजपच्या नगरमधील ज्येष्ठ पदाधिकार्याचे फेसबुक खाते हॅक; फॉलोअर्सकडे पैशांची मागणी

 
नगर : येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी, नगर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश कार्यकारणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड यांचे फेसबुक खाते करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्राध्यापक बेरड यांचे खाते हॅक करून, त्यांच्या नावाने फॉलोअर्सकडे पैशांची मागणी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्वतः प्राध्यापक बेरड यांनी ही माहिती दिली आहे.


सोशल मीडियातील खाते हॅक करून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. त्याचा फटका आता राजकीय पदाधिकाऱ्यांनी बसण्यास सुरुवात झाली आहे. नगर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष प्राध्यापक बेरड यांचे फेसबुक खाते हॅक करून एका फॉलोअरकडे नऊ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. संबंधित फॉलोअर्सकडून प्राध्यापक बेरड यांच्याकडे खात्री करण्यात आल्यानंतर त्यांचे खाते हॅक झाल्याचा प्रकार समोर आला.यासंदर्भात प्राध्यापक बेरड यांनी स्वतः खाते हॅक झाल्याची माहिती देत फॉलोअर्सना आवाहन केले आहे. 'माझे Bhanudas Berad हे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे.

बनावट अकाउंट उघडून, मेसेज केले जात आहेत. तसेच फॉलोअर्सना मेसेज करुन पैसे मागितले जात आहेत. सर्व फॉलोअर्सना विनंती आहे की, अशा कुठल्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका व थेट माझ्याशी संपर्क करा. या बाबत मी पोलीस विभागात तक्रार करणार आहे', असे प्राध्यापक बेरड यांनी म्हटले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only