Monday, July 5, 2021

केंद्र सरकारच्या 'स्टॉक लिमिट' निषेधार्थ मंगळवारी आडतेबाजार, मार्केट यार्ड, दाळमंडई बंदकेंद्र सरकारच्या 'स्टॉक लिमिट' निषेधार्थ मंगळवारी आडतेबाजार, मार्केट यार्ड, दाळमंडई बंद

नगर दि 5


 केंद्र सरकारच्या 'स्टॉक लिमिट' निषेधार्थ मंगळवारी आडतेबाजार, मार्केट यार्ड, दाळमंडई बंद राहणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी दिली.


नगर केंद्र शासनाने अचानकपणे कडधान्ये, दाळी यांवर कुठलाही विचार न करता 'साठवणूक मर्यादा' अत्यंत घाईघाईने पक लागू केली. या प्रकारामुळे देशभरातील पड व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या गोंधळाची परिस्थिती न्या निर्माण झाली असून, त्या निषेधार्थ अनेक राज्यांतील कृषि उत्पन्नांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले असून, नगरमधील सर्वात मोठ्या या आडतेबाजार मर्चंटस् असोसिएशनकडून या बारी नव्या नियमाचा निषेध करण्याच्या हेतूने री मंगळवार, ६ जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये शहरातील दाळमंडई,आडतेबाजार, दाणेडबरा, मार्केट यार्ड परिसरातील सर्व व्यावसायिक सामील होणार आहेत. तसेच नगर जिल्ह्यातील तालुका मार्केटमधील व्यापाऱ्यांनीसुद्धा या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे दि नगर आडतेबाज़ार मर्चंटस् असोसिएशनच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कडधान्यांचा व्यापार बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. तरी शेतकरी व ग्राहकांनी या बंदची नोंद घ्यावी, असे आवाहन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only