Wednesday, July 28, 2021

मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड भिंगार पोलिसांची कामगिरीमोक्का गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड

भिंगार पोलिसांची कामगिरी

मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपी गजाआड। नगर । दि.29 जुलै । सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपींना वाळूज (ता. नगर)  शिवारात पोलिसांनी अटक केली. विक्रम आनंदा गायकवाड, बाबा ऊर्फ भाऊसाहेब सोपान आढाव (दोघे रा. वाळूंज ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली.


सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव व बाळासाहेब रमेश भिंगारदिवे (रा. आगडगाव ता. नगर) हे गुन्हा घडल्यापासून पसार आहेत.


दरम्यान पसार आरोपी गायकवाड व आढाव वाळूंज शिवारात आले असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस कर्मचारी राहुल द्वारके, भानुदास खेडकर, रघुनाथ कुलांगे, गणेश साठे, अंबादास पालवे, अरूण मोरे, केतन पटेकर, निलेश विधावे यांचे पथक तयार करून आरोपींच्या अटकेसाठी पाठविले. पथकाने वाळूंज शिवारात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only