Tuesday, July 6, 2021

उड्डाणपूला करता वॉल कंपाऊंड पाडण्याचे काम सुरू नगर दि 7  प्रतिनिधी नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शहरातील हॉटेल अशोका चौकांमध्ये असलेले महानगरपालिकेच्या कंपाऊंड दूर करण्याचे काम सुरू झाले आहे.


गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेला उड्डाण पुलाचे काम सुरू झालेले आहे .आत्तापर्यंत 48 पोल हे पूर्णपणे उभारण्यात आलेले आहे. शहरातील सक्कर चौक ते हॉटेल अशोका हॉटेलं असा हा उड्डाणपूल होणार आहे, या पुलासाठी 256 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे .केंद्र सरकारच्या व राज्यसरकार च्या अखत्यारीतील या निधीतून हे काम सुरू करण्यात आले आहे. खासदार सुजय विखे यांनी यासाठी गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा केल्यामुळे या पुलाचे काम आज मार्गी लागलेले आहे .


ज्या ठिकाणी उड्डाणपूल  हा संपतो त्याठिकाणी आता मोठा चौक तसेच मोठा रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, येथील अशोका हॉटेल चौकामध्ये हा पूल पूर्णत्वाला जातो, या ठिकाणी महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची टाकी असून या ठिकाणी रस्त्यालगत े वॉल कंपाऊंड बांधण्यात आलेले होते ते पाडण्याचे काम आज हाती घेण्यात आलेले आहे. तसेच दुसर्‍या बाजूला सुद्धा अशा प्रकारचे रस्ता हे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर या चौकमध्ये येणारे रस्ते हे मोठे केले जाणार आहे.


तसेच उड्डाणपूला संदर्भामध्ये जे काम हाती घेण्यात आलेले आहे , तेथील बाजूचे रस्ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टप्प्याटप्प्याने या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे या रस्त्यालगत असणाऱ्यचे अनेक वॉल कंपाऊंड  सुद्धा पडणार आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only