Friday, July 2, 2021

पिडितेवरील अन्यायाच्या तपासातील निष्काळजीपणाची घेतली गंभीर दखल न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना दिले आवश्यक कार्यवाहीचे आदेश
पिडितेवरील अन्यायाच्या तपासातील

निष्काळजीपणाची घेतली गंभीर दखल

न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना दिले आवश्यक कार्यवाहीचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी- पिडीतेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी व तपासातील निष्काळजीपणा याची दखल न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.


आरोपीच्या जामीन अर्जाच्या चौकशीचे काम चालू असताना संबंधित गुन्हयाच्या तपासातील गंभीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा स्पष्ट उल्लेख जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशामध्ये केला व योग्य त्या कार्यवाहीसाठी आदेशाची प्रत पोलिस अधीक्षक यांना देण्याचे आदेश दिले. त्या आदेशामध्ये, संबंधित गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून तपासी अधिकारी यांनी या गुन्हयाचा तपास व्यवस्थित केला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या आदेशानुसार पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याची उत्सुकता आहे.


दोघेही अल्पवयीन


याबाबतची माहिती अशी की, अल्पवयीन मुलीस पळून नेल्याबाबत आरोपीविरुद्ध फिर्यादी यांनी दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी भा.दं. वि. का. कलम 363 प्रमाणे कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता. तेव्हापासून पोलिस मुख्य आरोपी व पिडीत यांचा शोध घेत होते. घटनेच्या वेळी पिडीत मुलगी ही 14 वर्षाची व आरोपी हा 17 वर्षे सहा महिन्याचा होता. वरील गुन्हयाचा तपास कर्जत पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे हे करत होते. त्यानंतर दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी आरोपीने पिडीत मुलीस मोटारसायकलवरून कर्जत येथे आणून सोडले व आरोपी पुन्हा फरार झाला. त्यानंतर पिडीतेने पोलिस स्टेशनला जावून घटनेबाबत तिचा सविस्तर जबाब दिला. या जबाबानंतर पोलिसांनी या गुन्हयात भा.द.वि.कलम 376 (2)(ख)(ग)(छ) सह 34 व पोक्सो कलम 3 व 4 नुसार वाढीव कलम लावले. पिडीत मुलीने तिच्या जबाबामध्ये खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते. यात पिडीत मुलीने सांगितले की, आरोपी व मी दि. 16.02.2020 रोजी गेल्यानंतर एका रुमवर 10 ते 15 दिवस थांबलो. त्यानंतर आरोपीच्या मामाने पिडीत व आरोपी यांना शिरूर येथे भाडयाने रुम घेवून दिली. त्याठिकाणी पिडीता व आरोपी हे दिनांक 30 डिसेंबर 2020 पर्यंत राहिले. तसेच पिडीतेने असेही सांगितले की, आरोपीने मार्च 2020 पासून दि. 30.12.2020 पर्यंत माझेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले तसेच यामुळे पिडीतेला एप्रिल 2020 मध्ये गर्भधारणा झाली. त्यावेळी ती अज्ञान असल्यामुळे आरोपीने इतर आरोपींच्या मदतीने तिचे खोटे आधारकार्ड बनवून व ती सज्ञान असल्याचे भासवून शिरूर येथील संतोष चौरे यांचे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी पिडीतेचा गर्भपात केला.


न्यायालयाने घेतली दखल


अशाप्रकारे गंभीर आरोप केल्यानंतर पोलिस गुन्हयाचा तपास करत होते. त्यानंतर यामधील आरोपीने दिनांक 10.06.2021 रोजी श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाबाबत न्यायालयात गुणदोषावर चौकशी होवून दिनांक 30.06.2021 रोजी न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. 1) एम. एस. शेख यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. परंतु या जामीन अर्जाच्या चौकशीचे काम चालू असताना या गुन्हयाच्या तपासातील खूप गंभीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा स्पष्ट उल्लेख जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशामध्ये केला व योग्य त्या कार्यवाहीसाठी या आदेशाची प्रत पोलिस अधीक्षक यांना देण्याचे आदेश केले. त्या आदेशानुसार, न्यायालयाच्या असे निदर्शनास आले की, संबंधित गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, तपासी अधिकारी यांनी या गुन्हयाचा तपास व्यवस्थित केला नाही.


हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्वजामीन अर्ज रद्द केला व तपासातील सर्व गंभीर बाबी न्यायालयाने आदेशामध्ये नमूद केल्या. त्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांना असे आदेश दिले की, या आदेशाची एक प्रत पोलिस अधीक्षक (नगर) यांना द्यावी व पोलिस अधीक्षक (नगर) यांनी गुन्हयासंदर्भात योग्य व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले. तसेच त्याचा अहवालही न्यायालयात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच मूळ फिर्यादी यांच्यावतीने अ‍ॅड. सुमित पाटील यांनी सहाय्य केले. दरम्यान, आरोपींच्या मदतीने मुलीचे खोटे आधारकार्ड बनवून व ती सज्ञान असल्याचे भासवून शिरूर येथील संतोष चौरे यांच

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only