Saturday, July 24, 2021

उत्पादन शुल्क विभागाची भाळवनीत मोठी कारवाई; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

 


उत्पादन शुल्क विभागाची भाळवनीत मोठी कारवाई; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

दिनांक 24 प्रतिनिधी


नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या भाळवणी शिवारामध्ये होत असलेल्या अवैध मद्य वाहतूकीवर नगर व पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे 22 लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य साठा २ चारचाकी, १ सहाचाकी ट्रक जप्त केला आहे.


आरोपी दिपक राधु गुंड, (वय ३९ वर्षे, रा. वडगाव गुंड, ता. पारनेर, जि. नगर), प्रकाश बाबाजी शेळके, (वय ३४ वर्ष रा.कवाद कॅम्प, निघोज, ता. पारनेर, जि. नगर) यास अटक करण्यात आली असून, राजु उर्फ राजेंद्र शिंदे हा गुन्हयातील मुख्य सुत्रधार फरार आहे.


नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी येथे अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन एक टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा सहा चाकी ट्रक (क्र. एमएच १४ ए एस ९५३१), एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन (क्र. एम एच १६ एम आर ९६३१) व एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहन  (क्र. एम.एच.०४ ई.डी. ३५८५) अशा तीन वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य, २ मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल आढळल्याने वाहनासह एकूण अंदाजे २१,९१,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


सदरची कारवाई कांतीलाल उमाप, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,  प्रसादजी सुर्वे,  विभागीय उपआयुक्त, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पाटील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, उपअधीक्षक संजय सराफ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर, श्री. दिंगबर शेवाळे, निरीक्षक, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे, भरारी पथक क्र. १ विभागाचे निरीक्षक श्री. ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक, कु. वर्षा घोडे, श्री. विजय सूर्यवंशी,  महिपाल धोका, गोपाल चांदेकर, विभागीय भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक श्री.एस.की. बोधे व श्री. एस. आर. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.व्ही. चव्हाण, व्हि. एन. रानमळकर, आर. एम. पारधे व जवान अहमद शेख, भरत नेमाडे, सतिश पोंदे, प्रताप कदम, अमर कांबळे, दिंगबर ठुबे, उत्तम काळे, नंदकुमार ठोकळ, प्रविण सागर, दिलीप पवार, अविनाश कांबळे, अंकुश कांबळे, वाहन चालक संपत बिटके, पांडुरंग गदादे व महिला जवान रत्नमाला काळापहाड यांनी केली आहे.


श्रीरामपुर व राहाता परिसरामध्ये छापे


नगर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपुर व राहाता परिसरामध्ये हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकले. आरोपी साधना मोहन काळे, छाया सोनाजी शिंदे यांना अटक करण्यात आली असुन, एक अज्ञात इसम फरार झाला आहे.


राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपुर, कोपरगाव व संगमनेर विभागाची संयुक्त कारवाई करून मोठया प्रमाणात श्रीरामपुर व राहाता येथील हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर धाडीटाकुन हातभट्टी दारुसाठी लागणारे ४८७० लिटर रसायन, ८३ लिटर गावठी दारु व इतर असा १,१६,९०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


सदरची कारवाई  श्री. गणेश पाटील, उपअधीक्षक, .एन. बी. शेंडे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नगर, निरीक्षक सर्व श्री.एस.के. कोल्हे, ए. व्ही. पाटील, बी.टी. घोरतळे, एस.एस.पाडळे, डि.आर.वाजे, बी.बी. हुलगे तसेच दुय्यम निरीक्षक पी.बी. आहिरराव. ए.जे. यादव, बी. एस. कडभाने, एन. सी. परते, डि.वाय. गोलेकर, के.यु.छत्रे, एस.बी. भगत, एन.डी. कोंडे, व्ही.एम. बारवकर, सहा. दुय्यम निरीक्षक कंठाळे, साठे, गारळे, जवान सर्वश्री साळवे, ढके, मुजमुले, लकडे, शेख, बर्डे, कर्पे, पाटोळे, निमसे, थोरात, मडके, बटुळे महिला जवान जाधव यांनी केली. कारवाई वेळी  गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नगर हे स्वतः सहभागी होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only