Saturday, July 31, 2021

पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा,पेट्रोल पंपावर काम करणारे दोन कर्मचारी जबर जखमी


अहमदनगर(नगरतालुका-प्रतिनिधी)-नगर-सोलापूर महामार्गावरील दहिगाव साकत गावानजीक असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या केतन पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडला आहे. रात्रीच्या अडीच-तीनच्या सुमारास सहा/सात दरोडेखोरांनी केतन पेट्रोल पंपावर शस्त्रांचा धाक धाकवत कर्मचाऱ्यांना मारहाण करत दीड ते दोन लाखांची रक्कम लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाणीत पेट्रोल पंपावर काम करणारे दोन कर्मचारी जबर जखमी झाले असल्याचे कळते. यावेळी पेट्रोल भरण्यास थांबलेल्या ग्राहकांना पण मारहाण करत त्यांच्या वाहनांच्या चाव्या काढून घेण्यात आल्या. घटनेची खबर नगर तालुका पोलिसांना कळल्यानंतर तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी गेले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only