Sunday, July 4, 2021

खरेदी-विक्री व्यवहारातून शहरातील गाडी-खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकाची तब्बल 9 लाखांची फसवणूकवाहनाच्या खरेदी-विक्री व्यवहारातून शहरातील गाडी-खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकाची तब्बल 9 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई येथील नासिर निसार मोहंमद कुरेशी याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अरबाब अत्तारअली सय्यद (रा.गुलमोहर रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. सय्यद यांनी कुरेशी याच्या कडून बीएमडब्ल्यु कार (एमएच 12 एलपी 0333) खरेदी केली होती. त्यापोटी 3 लाख 50 रुपये देऊन 78 हजार 578 रुपयांचे 53 हप्ते सय्यद यांनी द्यायचे ठरले होते. तशी नोटरीही दोघांमध्ये झाली होती. सय्यद यांनी 5 लाख 50 हजार 046 रुपये असे 7 हप्ते कुरेशी याच्याकडे जमाही केले. इतर हप्त्यांपोटी काही धनादेशही त्यांनी दिलेले आहेत. कुरेशी याने गाडीचे व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे कारण देत जाहिद शेख याच्या मार्फत सय्यद यांच्याकडून गाडी मुंबईला मागवून घेतली. दोन दिवस गाडी माझ्याकडेच राहू दे, असे सय्यद याला सांगितले.

सय्यद हे गाडी पर आणण्यासाठी मुंबईला कुरेशी याच्याकडे गेले असता, त्याने गाडी देण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सय्यद यांनी तोफखाना पोलिसात 9 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only