Friday, July 30, 2021

छाप्यात 43 टाक्यांसह तीन जण ताब्यात घरगुती गॅसचा काळाबाजार तोफखाना पोलिसांकडून उघड

 
छाप्यात 43 टाक्यांसह तीन जण ताब्यात घरगुती गॅसचा काळाबाजार तोफखाना पोलिसांकडून उघड

नगर,ता.30  प्रतिनिधी

गॅस ग्राहकांना घरपोहोच दिल्या जाणार्‍या गॅस टाक्यांमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस टाक्या भरत असलेल्या ठिकाणी तोफखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या छाप्यामध्ये 43 गॅस टाक्या पकडण्यात आल्या आहेत. तीन आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे.


भगवानराम गिरधरीराम बिष्णोई, वय 23 जोधपुर राजस्थान, भजनलाल जगदीश बिष्णोई, राहणार राजस्थान, तसेच एका अल्पवयीन मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे.तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सूचनेवरून गुन्हे प्रगटीकरण शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात 43 गॅस टाक्या व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. पकडण्यात आलेल्या टाक्यांचा पुरवठा विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.सावेडी उपनगरातील सिव्हिल हडको परिसरात एका बंद खोलीत ग्राहकांना घरपोच दिल्या जाणार्‍या गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करून व्यावसायिक वापराच्या टाकीत भरला जात होता. यावेळी तोफखाना गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकला. यावेळी कराचीवाला गॅस एजन्सीच्या नावे असलेल्या रिक्षा टेम्पो, 43 घरगुती व व्यावसायिक सिलेंडर्स आढळून आले. यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी तीन जणांना अटक असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे


सदरची कारवाई तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्‍योती गडकरी यांच्या अधिपत्याखालीपोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, शकील सय्यद, सचिन जगताप, शैलेश गोमसाळे, अभिजीत बोरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे


दरम्यान पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी गुन्ह्याची माहिती दिली. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या घरगुती सिलेंडरमधून दोन ते अडीच किलो गॅस चोरी करून व्यावसायिक वापराच्या टाक्या भरल्या जात होत्या. त्यामुळे नागरिकांना कमी गॅस मिळत होता. पोलिसांच्या कारवाई त हा काळा बाजार उघडकीस आला आहे. नागरिकानी गॅस घेताना टाक्या तपासून घ्याव्यात, असे आवाहन ही गडकरी यांनी केले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only