Friday, July 16, 2021

शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा

 

गाळा बांधकाम करायचे असेल प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्यांचा 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह सहा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी ही फिर्याद दिली आहे.

गिरीश जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 जुलै ते 15 जुलै 2021 दरम्यान ही घटना घडली आहे.

विजय सामलेटी यांच्यासह माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर असे काही जण दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले. हे गाळे येथे कसे उभे केले, तू मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पूर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला. मी सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी त्यांनी श्रीपाद छिंदम यांना दिली. त्यानुसार तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंढे हे करीत आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only