Saturday, July 17, 2021

ईडी संदर्भात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य प्रशासकीय नाही। गृहराज्यमंत्री शंभूराजे शंभूराजे देसाई यांचा टोला

 

ईडी संदर्भात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य प्रशासकीय नाही। गृहराज्यमंत्री शंभूराजे शंभूराजे देसाई यांचा टोला

नगर दि 17  प्रतिनिधी

 राज्यात ईडीची कारवाई मोठ्यावर होणार होणार आहे. कोणाला  संध्याकाळी अटक होणार,  कोणाला सकाळी अटक होणार असे  वक्तव्य भाजपचे, प्रदेशाध्यक्ष  करत असतील तर ते प्रशासकीय व परंपरेनुसार योग्य नाही, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी नगरमध्ये चंद्रकांत पाटील यांना लगावला .


मंत्री देसाई हे आज नगर येथे शासकीय विश्राम येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.


 देसाई  म्हणाले,  खासदार संजय राऊत  यांनी ईडीच्या संदर्भातील भूमिका या अगोदरच स्पष्ट केली आहे.  ती पक्षाची भूमिका आहे. राज्य शासनाच्या भूमिकेबाबत राज्याचे मुख्यमंत्री त्यावर बोलतील असेही त्यांनी सांगितले.


चंद्रकांत पाटील काय बोलले ते मी ऐकलं नाही. पण ईडीच्या कारवाई बाबत  केंद्र सरकारची यंत्रणा आहे, राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय  नेत्याने रात्री कोणाला अटक, सकाळी कोणाला अटक होईल अशी भविष्यवाणी करणे  परंपरेनुसार व प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही, असे ते म्हणाले.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीच्या संदर्भात  विचारल्यावर देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातल्या काही प्रश्नासंदर्भात त्यांची भेट असावी, जेव्हा अधिवेशन असते. त्याच्या अगोदर  मुख्यमंत्री सर्व खासदारांशी चर्चा करतात.   राज्यांचे अनेक प्रश्न असतात त्याच्या सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असा त्यामागचा उद्देश असतो अशा पद्धतीने मोदी व पवार यांची भेट अधिवेशनाच्या तोंडावर झाली आहे असेही ते म्हणाले.  महा विकास आघाडीचे सरकार  स्थापन झालेल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाने हे सरकार पडणार अशा पद्धतीच्या वलग्ना केल्या, आज पावणेदोन वर्ष झाली, नैसर्गिक संकट महाराष्ट्र आलं, कोरोना चा विषय आहे, या संकट वर मात करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली परिस्थिती हाताळलेली आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महा विकास आघाडी स्थापन करून ही आघाडी पाच वर्षं नाही तर पंचवीस वर्ष राज्याचा व्यवस्थित कारभार करेल असे अनेक वेळा वक्तव्य केले आहे असेही देसाई म्हणाले.


सीबीआय तपासा संदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  आर्थिक गैरव्यवहार संदर्भात राज्य सरकारच्या स्वतंत्र यंत्रणा तपास करीत असतात. त्यांच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा सुद्धा राज्य सरकारचे पोलिस दलाच्या स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सीबीआयचा तपास संदर्भात याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे,  इडीच्या बाबतीत  राज्याचे मुख्यमंत्री  बोलतील असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.


राज्य सरकार मध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तर महा विकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेत असतात. भास्कर जाधव यांनी  मला अध्यक्ष व्हायचे असे म्हटले नाही. त्यांनी जर तीन पक्ष माझ्या नावावर एकमत करत असतील तर माझे दुमत नाही असे वक्तव्य केले होते  असेही देसाई यांनी सांगितले.महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे निर्णय घेतला जातो असे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता पहिली लाट ,दुसरी लाट, हीसुद्धा लक्षात घेता. पोलिस विभागातील ज्या ज्या नियमित बदल्या आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा ही बदल्यांची प्रक्रिया जी काही नियमित आहे ती सुरू राहील असेही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.


पंढरपूरच्या वारी संदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी वेळोवेळी बैठका घेऊन वारकरी संप्रदायाच्या संघटना आहेत त्यांच्याशी सातत्याने चर्चाही केली व त्यातून काही निर्णय सुद्धा त्यांनी घेतले आहेत.  गेल्या वर्षी सरकारने फक्त 50 वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी दिली होती पण आता शंभर जणांना जाण्याची परवानगी देऊन  सैल धोरण घेतले आहे.  पायी वारी  परवानगी असती तर ते ज्या ज्या ठिकाणी थांबतील त्या त्या गावांमध्ये सुद्धा अनेक जण दर्शनासाठी येतात व तेथे गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी त्यांना बसने जाण्याची परवानगी दिली आहे असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोरोना नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे पोलिसांनी व महसूल विभागाने कारवाई केलेली आहे. यामध्ये कोणालाही सोडलेले नाही. ज्या ठिकाणी  नियम मोडले आहेत अशांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. संबंधित  मंगल कार्यालय चालकावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासन त्याबाबत कारवाई करत आहे असे  त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only