Friday, July 2, 2021

शहराबाहेरील बाहेरील नागरिकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणले शहरां मध्ये लसीकरणासाठी, सावेडी उपकेंद्रावर जोरदार राडा

शहराबाहेरील बाहेरील नागरिकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणले शहरां मध्ये लसीकरणासाठी, सावेडी उपकेंद्रावर जोरदार राडा

नगर दिनांक 2 प्रतिनिधी 

नगर महापालिकेच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर तुफान हाणामारी झाली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी  परस्पर  शहराबाहेरील नागरिकांना या लसीकरण केंद्रावर लस घेण्याकरता आल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी चांगलाच राडा घातला यामध्ये गंधे यांना सुद्धा धक्का बुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही निश्चितपणे कारवाई करू , पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त दिला असल्याचे त्यांनी सांगितले.


मनपाच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होते. एका खासगी कंपनीतील कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांना लसीकरण केंद्रावर घेवून आले होते. लसीकरणावरून त्यांच्यात प्रथम वादावादी झाली व त्यांनतर त्यांच्यात हाणामारी झाली . यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष गंधे याना धक्काबुक्की झाली, सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. लसीकरणासाठी आलेले नागरिक हे परत निघून गेले तर काहींना सुद्धा या धक्काबुक्कीच त्रास झाला.


नेमके  बाहेर गावावरून शहरामध्ये लसीकरणासाठी भाजपचे पदाधिकारी त्यांना का  घेऊन आले, याची चर्चा नगर शहरांमध्ये जोरदारपणे सुरू आहे अशा प्रकारचे चित्र याअगोदर झाले आहे का याची सुद्धा आता शहानिशा प्रशासनाने करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे.तोफखान्याच्या तीन कर्मचार्‍यांचा बंदोबस्तलसीकरण केंद्रावर हाणामारी झाल्याची माहिती समजल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरसे आणि उपनिरीक्षक मुंढे यांनी केंद्राला भेट दिली. लसीकरण केंद्रावर कोणतीही हाणामारी झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते लस घेण्यासाठी तेथे आल्यानंतर त्याठिकाणी गर्दी झाली होती व त्यानंतर गोंधळ झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लसीकरण केंद्रावर पुन्हा अशी घटना घडु नये म्हणून त्याठिकाणी तीन पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only