Wednesday, July 28, 2021

जुगार खेळण्यासाठी स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव, कोतवाली पोलिसांनी केला काही तासात बनाव उघड


जुगार खेळण्यासाठी स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव, कोतवाली पोलिसांनी केला काही तासात बनाव उघड

नगर दिनांक 28 प्रतिनिधी


 शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर काम करणाऱ्या मुलाने आपल्या डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी आपलेच अपहरण झाले असे भासवून वडिलांना बुचकळ्यात पाडले, कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांमध्हा हा प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी त्या मुलाला ऑनलाइन जुगारी चा नाद असल्याचे समजले आहे या प्रकरणाचा  पोलिस शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


 आकाश एकनाथ मुळे वय 23 राहणार शिराळ चिचोंडी, तालुका पाथर्डी, असे त्याचे नाव आहे.


आकाश हा हॉटेल सगम हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहे,काल रात्री  साडेबारा वाजता त्याची ड्युटी संपली, रात्री दोन पर्यंत तो घरी आला नाही म्हणून त्याचे वडील एकनाथ यांनी त्याला फोन लावला, त्या वेळी मुलाने मला कुणीतरी किडनॅप केलेले आहे, मला दोन लाख रुपये द्या अशी मागणी त्याने त्याच्या वडिलांकडे केली, वडिलांनी त्याला तू कुठे आहे. कोणाकडे आहे. याची विचारणा केली त्याने अगोदर मला पैसे द्या मग ते सांगणार असे सांगितले.


त्याच्या वडिलांनी तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क करुन त्यांना घडलेल्या प्रकारची माहिती  सांगितली, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी तात्काळ त्याचा शोध लावण्याचे आदेश दिले , त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव दुर्गे, एपीआय नितीन रणदिवे, योगेश भिंगारदिवे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, कैलास शिरसाट, तानाजी पवार, बंडू भागवत, शाहिद शेख यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला असता तो नेवासा तालुक्यातील देवगड येथे पहाटेच्या सुमाराला आढळून आला.


आकाशाला कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये आले असता त्याची विचारपूस करण्यात आली तो सुरुवातीला कोणतेही उत्तरे देत नव्हता, पोलिसांनी त्याच्या कडे असलेल्या मोबाईलची तसेच त्याच्या नातेवाइकांकडून माहिती घेतल्यावर त्याला ऑनलाईन जुगार लचा नाद होता व त्याच्याकडे तसे प्रकारचे पुरावे सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहे, त्याला जुगार खेळण्यासाठी पैसे लागत असावे असा अंदाज आहे.


दरम्यान या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्याशी संपर्क साधला असता सदरचा प्रकार हा उघडकीला आलेला आहे मात्र त्याचे अजून कोण कोण साथीदार आहे व त्याने अजून कोणाकोणाला पैसे दिले आहेत का ,किंवा त्याला कोणाचे पैसे  द्यायचे आहे काय याचा सुद्धा तपास पोलीस करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात संघमध्ये कलम 182 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याच्या साथीदारांची सुद्धा पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे.


चौकट


आकाश  याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तो काहीच माहिती देत नव्हता पोलिसांनी व त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याकडून माहिती गीतांना अनेक प्रश्नांचा भडीमार केल्यावर त्याने काहीप्रमाणात उडवाउडवीची उत्तरे दिली मोबाईल ज्यावेळेला त्याचा तपासला त्यावेळेला अनेक बाबी यातून उघड झाल्या.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only