Tuesday, July 13, 2021

किराणा दुकान फोडून 70 हजारांचा ऐवज लंपास

 


किराणा दुकान फोडून 70 हजारांचा ऐवज लंपास


नगर : केडगाव येथील कापरेमळा येथे एक किराणा दुकान फोडून रोख रकमेसह किराणा माल असा सुमारे 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 13 जुलै रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी

लक्ष्मण रघुनाथ कापरे (वय ४५, धंदा-किराणा दुकान, रा. कापरेमळा, सोनेवाडीरोड, केडगाव ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कापरे यांचे ओम किराणा जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून 12 जुलै रोजी दुपारी ४ वाजता दुकान व्यवस्थीत लॉकलावून बंद केले होते. १३/०७/२०२१ रोजी पहाटे ४.०० वाजता त्यांचे भाडेकरी रसुल मुज्जवर शेख यांनी कापरे यांच्या किराणा दुकानाचा दरवाजा कोणीतरी उघडला आहे, असे त्यांना सांगितले. कापरे यांनी जावुन पाहिले असता दरवाजांचे कुलूप तुटलेले दिसले. सामानाची पाहणी केली असता, दुकानातील सामानाची उचकापाचक झाली होती. टेबल ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये रोख रक्कम, तसेच किराणा दुकानातील तेलांचे डब्बे व किराणा सामान अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only