Sunday, July 18, 2021

मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी करणा-या आरोपीस कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी करणा-या आरोपीस कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे.

नगर दि 17 प्रतिनिधी


मंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरी करणा-या आरोपीस कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे.


आरोपीरामदास विष्णु सावंत रा जांबुत ता संगमनेर जि नगर याला अटक केली आहे.


दि 9 जुलै २०२१ रोजी  रात्री च्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराच्या संरक्षण जाळीवरुण आत प्रवेश करुन शनिमंदिरातील दानपेटी व चांदीचे दागीने चोरुन घेवुन गेला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गुन्हा रजि नं. ४८५ / २०२१ भा.दं.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.


 सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक  राकेश मानगांवकर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीतील दागीने विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावुन संशयित इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रामदास विष्णु सावंत रा जांबुत ता संगमनेर जि अहमदनगर असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.


 त्याची अंगझडती घेता त्याचेकडे मंदिरातुन चोरी केलेले चांदीचे दागीने मिळुन आले आहेत. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पवार हे करत आहेत.


सदरची कारवाई . पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक  सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल शरद ढुमे, यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर सो, सपोनि विवेक पवार, गुन्हेशोध पथकाचे पोना योगश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना शाहीद शेख, पोना सागर पालवे, पोकाँ सुजय हिवाळे, पोकाँ भारत इंगळे, पोकॉ सुमित गवळी, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकाँ तान्हाजी पवार, पोकाँ प्रमोद लहारे, पोकाँ सोमनाथ राऊत यांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only