Friday, July 9, 2021

दोघांविरूध्द पोलिसांत तक्रार खोटा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याला धमकीदोघांविरूध्द पोलिसांत तक्रार खोटा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याला धमकी

नगर,ता.9-प्रतिनिधी


 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर सचिव नीलेश बांगरे यांना दोन अनोळखी इमसांनी पोलिसांच्या विरोधात पोस्ट टाकली तर जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आज कायनेटीक चौकातील रविश कॉलनी येथे घडली. याप्रकरणी ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे


नगर शहरामध्ये मागील महिन्यामध्ये कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड व केडगाव येथील दोन ठिकाणी रेशनचा गहू व तांदूळ हा काळ्या बाजारामध्ये विक्रीला जात असताना कारवाई करून सुमारे 42 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला होता या प्रकरणी सुरुवातीला सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता


कोतवाली पोलीस ठाणे या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर सदरचा गहू हा पंजाब व मुंबई येथून खरेदी केला असल्याचे तपासात उघड झाले होते त्यावेळेला पोलिसांनी एका जणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते व त्याला परस्पर रित्या नंतर सोडून देण्यात आले होते यामध्ये कोतवाली पोलिसांवर दबाव असल्याचे सुद्धा बोलले जात होते या प्रकरणात संदर्भामध्ये निलेश बांगरे यांनी या विषयाला वाचा फोडली होती


याबाबत बांगरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बांगरे हे घरासमोर उभे असताना दोन अनोेळखी इसम तेथे आले. ते बांगरे यांना म्हणाले की, एपीय विवेक पवार यांच्या विरोधात पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकली तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच पोलिसांच्या विरोधात पोस्ट टाकू नको, नाही तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून करिअर संपून टाकू, अशी धमकी दिल्याचेे बांगरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only