Thursday, July 29, 2021

नगरमध्ये दुचाकी गाडीच्या डिक्कीतून व्यापाऱ्याचे 2 लाख 40 हजार रुपये लंपास
नगरमध्ये दुचाकी गाडीच्या डिक्कीतून व्यापाऱ्याचे अडीच लाख लंपास

नगर दि 29 प्रतिनिधी 

बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यापाराच्या गाडीच्या डिक्कीतील 2 लाख 40 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.


कैलास मपलानी यांचे डायमंड एन्टरप्राईजेस नावाचे दुकान आहे. काल दुपारच्या सुमारास ते दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानातील कामकाज संपल्यानंतर त्यांनी त्यांची दुचाकी गाडीच्या (क्र. एमएच 16 बिके 3933 डिक्की मध्ये दोन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम ठेऊन ते बँकेमध्ये गेलेले होते. सायंकाळच्या सुमाराला तेथील युनियन बँक या ठिकाणी गाडी पार्क करून ते बँकेमध्ये विचारपूस करायला गेले असता, त्याच वेळेला कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली दोन लाख 40 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ते बाहेर आल्यानंतर गाडीतल्या पैशाची चोरी झाले असल्याचे समजले. त्यांनी कोतवाली पोलीस  ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only