Wednesday, July 14, 2021

बनावट दस्त तयार करणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केली जेरबंदबनावट दस्त तयार करणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात केली जेरबंद

नगर दिनांक 14 प्रतिनिधी 


तोतया इसम उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड व पैन कॉर्ड तयार करुन बनावट खरेदीखत नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी नगर शहरातील सराईत टोळी कोतवाली पोलीसाकडून चोविस तासात जेरबद करण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली.


आरोपी मध्ये  तोतया इसम शेख नासिर शब्बीर, बनावट पत्ता गावठाण ता.जामखेड जि. नगर, नाझीम कुरेशी रा . नगर, सत्तार बागवान, रा.घर नं १८२१, सुभेदार गल्ली रामचंद्र खुंट, नगर,  सिध्दार्थ धनेश्वर सोलंकी रा. प्लॉट नं ३० वास्कर कॉलनी, बहारवाडी भिंगार,  राजेश रामु कनोजीया रा. ब्लॉक में बी.ए. माधवबाग, भिंगार , रोहित सिसवाल पूर्ण नाव नाही रा. भिंगार यांचा समावेश आहे. 


या मध्ये शेख नासिर व रोहित सीसवाल हे फरार आहेत अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


नगर तालुक्यातील मदडगाव येथे मौजे 182 मधील एक हेक्टर जमीन ही शशिकांत आठरे राहणार मडगाव यांना या आरोपींनी दाखवली होती .सदरची जमीन ही आम्ही तुम्हाला खरेदी करून देतो असे सांगितले. त्यांच्यामध्ये सुमारे दोन ते तीन बैठका सुद्धा झालेल्या होत्या, यामध्ये सदर जागेच्या संदर्भात 17 लाख रुपये मध्ये  जमीन खरेदी करण्याचा विषय झाला त्यानुसार आठरे यांनी यातील तोतया असलेल्या नसीर शब्बीर याला 11 लाख 85 हजार रुपये रोख दिले होते ,उर्वरित रक्कम ही धनादेशाद्वारे सुमारे पाच लाख रुपयांची देण्यात आलेली होती. असा व्यवहार करण्यात आलेला होता. सदरची दस्त नोंदणी केल्यानंतर शशिकांत आठरे यांनी ज्या वेळेला याची तपासणी केल्यावर हा दस्त खोटा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात संदर्भामध्ये अधीक्षक पाटील यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी या तपासासाठी एक पथक पाठवून वरील आरोपींना काल ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता  त्यांनी

नासिर शवास उभा करून त्यांचे बनावट आधार कार्ड ८२४५३१४०३९४६ व पॅन कार्ड BXLGR2767D याचा वापर करुन सदर जमीन ही फिर्यादी आठरे  यांना विक्री करून ११,८५,०००/- रुपये रोख रक्कमेची व ०५ १५,०००/- रुपये रक्कम चेकने अशी एकूण १७,००,०००/- रुपये रक्कमेची फसवणूक केली

 संगनमताने हा गुन्हा केल्या असल्याची कबुली सुद्धा दिली. विशेष म्हणजे सदरची जमीन ही मूळ मालक आमिर  मोहम्मद गौस शेख याच्या नावाने आहे मात्र या आरोपींनी याअगोदर यास मालकाची जमीन दुसऱ्याला सुद्धा अशाच प्रकारे दुसरे नाव वापरून विकून दिली होती, हेसुद्धा तपासामध्ये उघड झाले आहे.  


आरोपी यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने चार आरोपीना पोलीस पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हयात वरील चार आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सतिश शिरसाठ करीत आहेत.


सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक  सौरभ अग्रवाला ,  उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विशाल ढुमे  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  राकेश मानगांवकर च पोलीस उप निरीक्षक सतिश शिरसाठ, पोर्को  बापुसाहेब गोरे व पोको योगेश कवाष्टे यांनी केली आहे. 


- यातील मुख्य सुत्रधार आरोपी  नाजीम मुस्ताक कुरेशी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only