Thursday, July 1, 2021

कोतवाली हद्दीतील सुमारे 5 हजार गुन्याचा केला निपटारा

 कोतवाली हद्दीतील सुमारे 5 हजार गुन्याचा केला निपटारा

नगर दिनांक 1प्रतिनिधी

 गेल्या दीड वर्षापासून कोरोना संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या कोतवाली पोलिस हद्दीतील सुमारे साडेपाच हजार प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली.राज्यामध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर अनेक निर्बंध राज्य शासनाने घालून दिलेले होते. त्यामध्ये जे कोणी विना मास्क फिरत होते, अशांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा त्या वेळी दिले होते. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी पोलीस विभागाने केलेली होती. नगरमध्ये त्यावेळेला अकरा हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते.


विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करून कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले होते. सदरचे गुन्हे हे प्रलंबित होते. या गुन्याचा निपटारा करून  त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेले सुमार साडेपाच हजार गुन्ह्यांची नोंद होऊन त्या गुन्हयाचा निपटारा करण्यात आला .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only