Sunday, July 4, 2021

शहरांमध्ये पोलिसांनी केली कारवाई सुरू

 

नगर दिनांक 5 प्रतिनिधी


 दोन दिवस विथ लॉकडाऊन असताना विनाकारण लोक रस्त्यावर फिरत असल्याचा प्रकार घडत चालल्यामुळे आज तोफखाना हद्दीमध्ये दिलीगेट परिसरामध्ये तर कोतवाली हद्दीमध्ये टिळक रोड परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.


राज्य शासनाने असे निर्बंध लागू केले आहेत, शनिवार व रविवार लोकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता  इतर व्यवहार बंद असताना देखील सुद्धा नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना आढळून येत आहे. अनेक जण मास्क वापरसुद्धा करत नाही ही बाब सुद्धा दिसू लागलेली होती, कोतवाली व तोफखाना हद्दी मध्ये गेल्या दोन दिवसापासून पोलिसांनी धडक कारवाईमुळे हाती घेतलेली आहे, विनाकारण फिरणार जे कोणी आहे त्यांना  दंड ठोठावला आहे, ज्यांच्याकडे लायसन नाही , नियमांचे उल्लंघन केले आहे, अशांवर सुद्धा कारवाई केली जात आहे. आज सकाळपासूनच दिल्ली गेट परिसरामध्ये तोफखाना पोलिसांनी ही कारवाई मोहीम सुरू केली तर कोतवाली हद्दीमध्ये आयुर्वेद हॉस्पिटल जवळ पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे .


आज साधारणता दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड सुद्धा दुपारपर्यंत पोलिसांनी वसूल केलेला आहे. आज नगर मध्ये पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असून बंद चा आढावा सुद्धा ते घेत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेचे विशेष पथक सुद्धा बंद बाबतचा आढावा घेऊन काही ठिकाणी दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येत आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only