Saturday, July 24, 2021

नगर शहरामध्ये कापड बाजारात घुसला कंटेनर

नगर शहरामध्ये कापड बाजारात घुसला कंटेनर

 नगर दिनांक 24 प्रतिनिधी नगर शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असताना सर्रासपणे वाहने शहरांमध्ये येत आहे पण आज पुण्याकडे जाण्यासाठी निघालेला कंटेनर हा मुख्य मार्गांनी न जाता तो  नगर शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारांमध्ये थेट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाहतूक इंटरनेटचा एक प्रकारे बोजवारा उडाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही संबंधित गाडी चालक हा नशेमध्ये असल्याचे बोलले जात आहे


अवजड वाहनांना शहरांमध्ये येण्यास बंदी आहे त्यातच नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे बरीच वाहतूक  ही बाह्यवळण रस्त्याच्या मार्गे वळविण्यात आलेली आहे


आज रात्री नऊच्या सुमाराला मनमाड च्या दिशेने पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर हा बाह्यवळण मार्गाने न जाता तो थेट नगर शहरातील कापड बाजारांमध्ये येऊ  धडक ला विशेष म्हणजे त्याच्या मागे सुद्धा एक दोन अशा गाड्या होत्या, मात्र त्या मागच्या मागे निघून गेले. विशेष म्हणजे चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो रस्त्याच्या एका बाजूला अडकून पडला घास गल्ली कॉर्नरला हा कंटेनर अडकून पडल्यामुळे मोठी तारांबळ झाली. कोतवाली पोलीस व अन्य पोलिस या ठिकाणी आले व त्यांनी हा कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.


दरम्यान एवढी मोठी अवजड वाहने शहरात आले कशी हा खरा प्रश्न आहे संबंधित चालक हा नशेमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. वास्तविक पाहता मुख्य बाजारपेठेमध्ये म्हणावी अशी गर्दी नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only