Monday, July 26, 2021

नगर शहरात पुन्हा अतिक्रमण मोहीम


नगर शहरात पुन्हा अतिक्रमण मोहीम

नगर शहरामध्ये आज  महानगरपालिका अतिक्रमण विभागाने अतिक्रमण मोहीम शहरातील जुने बस स्थानकापासून तर कापड बाजारापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या टपर्या महापालिकेने या जप्त केल्या आहे. दरम्यान महिनाभर ची कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहील तसेच ज्यांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता ज्यांनी  पक्के बांधकाम केले आहे त्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख कल्याणकुमार बल्लाळ यांनी दिली.


नगर शहरामध्ये  अतिक्रमण  मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे महानगर पालिकेने गेल्या आठवड्यात काही प्रमाणामध्ये कारवाई सुरू केली होती, आज सकाळी जुन्या बस स्थानकापासून अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली . माळीवाडा भागामध्ये असलेल्या अनधिकृत व्यवसाय करण्यावर कारवाई करून काहींच्या टपऱ्या सुद्धा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत. कारवाईची मोहीम सुरू होताच अनेकांनी आपापली वाहने ही दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे.


शहरामध्ये अतिक्रमण मोहीम  सुरू झाल्यामुळे अनेकांची  धांदल उडाली ,अतिक्रमण वाढत गेले असल्याने महानगरपालिकेने ही धडक कारवाई केली आहे . येथील माळीवाडा व आशा टॉकीज चौकांमध्ये असलेल्या हातगाड्या सुद्ध  काढण्यात आले आहे. कापड बाजार तसेच घास गल्ली परिसरामध्ये असलेले अतिक्रमण सुद्धा काढण्यात आलेले आहे दुपारपर्यंत अशी कारवाई होईल सुरू होती


 या संदर्भामध्ये अतिक्रमण विभागाचे प्रमुख बल्लाळ यांनी आम्ही एक महिना कारवाई सुरू ठेवणार आहोत शहरांमध्ये जे काही अतिक्रमण आहेत ते काढले जाणार आहे, तसेच काही जणांची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासमोर सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जो कायदेशीर  निर्णय होईल त्या नुसार  अतिक्रमण काढले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


आजच्या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे, प्रभाग अधिकारी दिनेश सिनारे, रिजवान शेख, अर्जुन जाधव, वैभव जोशी नितीन इंगळे, शशिकांत देवकर, सतीश दारकुंडे कर्मचारी या पथकामध्ये सहभागी झाले होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only