Saturday, July 31, 2021

मोक्कातील दोन आरोपींना पोलीस कोठडी


नगर दिनांक 31 प्रतिनिधी 


मोक्याच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केलेल्या दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


बंडू साहेबराव साठे वय 22 राहणार सिद्धार्थनगर, अजय राजु पठारे 26 राहणार सिद्धार्थनगर,नगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.


तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत  कुविख्यात गुंड विजय पठारे याच्या टोळीवर गुन्हा दाखल झालेला होता, त्यावेळेला या आरोपींना त्या मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्या नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती.


पठारे याच्या टोळी विरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे या अगोदर दाखल होते, ज्या वेळेला तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता. त्यावेळेला या आरोपींचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव तोफखाना पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता ,तो प्रस्ताव नाशिक येथे वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. पठारे टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.


 त्यानंतर यावरील दोन आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना मोक्याच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्यात आले ,त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे आहेत या गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर आहे .पोलिसांना या गुन्ह्याचा शोध घ्यायचा आहे तसेच त्यावेळेला त्यांचे कोणकोण साथीदार होते याचासुद्धा तपास करायचा आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने न्यायला मदत करण्यात आला. न्यायालयाने वरील दोन आरोपींना 17 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only