Saturday, July 3, 2021

नगर शहरातून एकाच दिवशी तीन जण बेपत्तानगर दि.4

नगर शहरातून शुक्रवारी दिवसभरात दोन युवतींसह तीन जण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधितांच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

एकाच दिवशी अवघ्या काही तासांमध्येच हे तिघेही बेपत्ता झाले आहेत. यात एका सरकारी कर्मचार्‍यासह दोन युवतींचा समावेश आहे. 53 वर्षीय सरकारी कर्मचारी नोकरीसाठी घरातून निघाल्यानंतर घरी परतला नसल्याचे नातेवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे. तर एक 20 वर्षांची युवती काटवन खंडोबा परिसरातून शुक्रवारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली आहे. मूळची जामखेड येथील ही युवती असल्याचे समजते. आणखी एक युवती नगर-पुणे रोडवरील इलाक्षी शोरुम जवळून बेपत्ता झाली आहे. मूळची फैजाबाद (उत्तरप्रदेश) येथील ही युवती सध्या नगर-पुणे रोडवरील सीना नदी पुलाजवळ राहात होती. शुक्रवारी 10 वाजता ही युवती बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे.

नगर शहरातून एकाच दिवशी तीन जण बेपत्ता झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तिघांचाही शोध सुरू असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only