Sunday, July 4, 2021

5 आरोपींवर मोका ची कारवाईनगर दिनांक पाच प्रतिनिधी


नगर जिल्हयात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले वय, २२ रा. जुना सारोळा कासार, ता. जि. नगर व त्याचे टोळीतील इतर ४ सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.


 राहूल निर्वाश्या भोसले, वय २२ वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता. जि. नगर ( अटक)  उरुस ज्ञानदेव चव्हाण, वय ३३ वर्षे, रा. बुरुडगाव, ता. जि. नगर (अटक) , दगू बडूद भोसले, वय २७ वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर ( अटक ), निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले, रा. सारोळा कासार, ता. जि. नगर ( फरार , पप्या मोतीलाल काळे, रा. पैठण, ता. पैठण, जि. (फरार) यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांनी नगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन गु.रा.नं. १८१/२०२१ भा. दं. वि. क. ३९५, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दि. १५/०४/२०२१ रोजी घडला होता. सदरच्या आरोपींवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये इतर गुन्हे दाखल होते. सदरचा गुन्हा राहुल निवाश्या भोसले वय, २२ रा. जुना सारोळा कासार, ता. जि. अहमदनगर ( टोळीप्रमुख ) व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता नगर तालुका पोलीस स्टेशन जावक क्रं ३४९४/२०२१ दिनांक २८ जून २०२१ रोजी (मोक्का) प्रस्ताव  विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता.


सदर प्रस्तावास दिनांक ०२ जुलै२०२१ रोजी  विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाली 


सदर टोळीविरुध्द खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संगमनेर, कोपरगाव, नगर तालुका या हद्दीमध्ये दरोडे जबरी चोरी खुनाचा प्रयत्न करणे यासह विविध प्रकारचे गुन्हा या टोळी विरोधात दाखल होते .


असे दाखल असलेले गुन्हे टोळीने संघटीतपणे केलेले आहेत. सदरचे गुन्हे हे नगर जिल्हयातील नगर तालुका, कोपरगाव तालुका व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, फसवणूक करुन दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, घातक शस्त्रासह दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, कट करुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करतांना खुन करणे, इत्यादी प्रकारचे दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (11), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग जि. नगर हे करीत आहेत.


वरील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे नगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत . पोलीस अधीक्षक. मनोज पाटील , यांनी दिलेले आहेत.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only