Tuesday, July 27, 2021

अर्बन बँक शेवगाव शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या आत्महत्येपुर्वी आढळली चिठ्ठी । जिल्ह्यात खळबळ

 

अर्बन बँक शेवगाव शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या आत्महत्येपुर्वी आढळली चिठ्ठी ।  जिल्ह्यात खळबळ

नगर दिनांक 27 प्रतिनिधी    नगर अर्बन को-ऑपरेटिव बँकेचा कारभार सर्वत्र गाजत असताना आज नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 27 रोजी दुपारी  उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे बनावट सोने तारण याचा विषय आता चांगलाच पुन्हा गाजणार आहे. शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे पाठविण्यात आलेला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. 31 मे 2021 रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता.


आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव तालुक्यास जिल्ह्यात समजताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता त्यानंतर त्यांचा मृतदेह नगर येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे.


आत्महत्येपुर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे.


मयत गोरक्षनाथ शिंदे यांच्या खिश्यामध्ये आत्महत्येपुर्वी लिहलेली एक चिठ्ठी आढळली आहे. मात्र या चिठ्ठीत काय लिहिले याबाबत समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस बीबी शेळके करत आहे.


दरम्यान नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये ज्या 365 बनावट सोन्याच्या पिशव्या आढळून आल्या होत्या त्या संदर्भातला गुन्हा अद्याप पर्यंत दाखल झालेला नाही.  विशेष म्हणजे काल काही अधिकारी सदरचा गुन्हा दाखल करण्यासाठी हे शेवगाव मध्ये गेले होते मात्र सदर बनावट पिशव्या नगरमध्ये  उघडकीला आलेल्या आहेत त्यामुळे सदरचा गुन्हा नगर येथे दाखल करावा असा विषय झालेला आहे अशी माहिती पुढे आलेली आहे द्यापपर्यंत याचा गुन्हा दाखल झालेला नाही. ज्या व्यवस्थापकाने आत्महत्या केली त्यांनीच 2018साली शेवगाव शाखेमध्ये सोने तारण याचा विषय पुढे आलेला होता त्यावेळेला शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन ही बाब निदर्शनास आणली होती. त्या वेळेला हा विषय चांगलाच गाजला होता मात्र तीन वर्ष उलटून गेले तरीही कोणीही याची दखल घेतली नाही ज्या वेळेला प्रशासकाची नियुक्ती झाली व या पिशव्यांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला त्यावेळेला मागील महिन्यामध्ये या शाखेतील 365 पिशव्या या बनावट असल्याचे उघड झाले होते. त्यातच आता शिंदे यांनी आत्महत्या केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे त्यातच शिंदे यांनी जी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये नेमके कोण कोण आहेत काय आहेत याचा उलगडा होऊ शकलेला नाही ,त्यातच काय नेमका त्यांनी मजकूर लिहिलेला आहे हे कळू शकले नाही या संदर्भामध्ये शेवगाव पोलिसांची संपर्क साधला असता तपास सुरू आहे असे फक्त सांगितले. जो सोने तारणाचा विषय काढलेला आहे त्या संदर्भामध्ये आता पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only