Wednesday, July 7, 2021

संबंधीतांवर 2 दिवसात जर कार्यवाही न झाल्यास सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आक्रमक पवित्र घेतील असा इशारा देण्यात आला.संबंधीतांवर 2 दिवसात जर कार्यवाही न झाल्यास सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आक्रमक पवित्र घेतील असा इशारा देण्यात आला.

नगर दि 7 प्रतिनिधी 

 समुदाय आरोग्य अधिकारी डॉ गणेश शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समुदाय आरोग्य संघटनेच्या वतीने आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरम्यान सर्व आंदोलन करत यना भेटून न दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील गेटवर त्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. दरम्यान,संबंधीतांवर 2 दिवसात जर कार्यवाही न झाल्यास सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आक्रमक पवित्र घेतील असा इशारा देण्यात आला.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 06 जुल 2021 रोजी उपकेंद्र करंजी ता. पाथर्डी जिल्हा येथे कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ गणेश शेळके यांनी प्रशासनाच्या हेतुपुरस्सर जाणून बुजून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्तव्यावर असताना आत्महत्या केली, त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटवरून असे निदर्शनास येते की, वरिष्ठ अधिकारी हे जाणून बुजून त्यांना लक्ष करत असत व त्यांच्यावर हेतुपुरस्सर अतिरिक्त कामाचे लक्ष देऊन त्यांना सतत तणावामध्ये राहण्यास परावृत्त करत असत, अशा प्रकारचे खंत त्यांनी वारंवार त्यांच्या सोबतीस असलेल्या सहकार्यांस देखील व्यक्त केली तसेच संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिली परंतु त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी त्यांना लक्ष करून मानसिक दृष्ट्या तणावामध्ये राहण्यास परावृत्त केले, तसेच त्यांचे गेल्या 3 महिन्यांचे मानधन देखील देण्यात आले नाही व त्याचीच पार्श्वभूमी म्हणून डॉ शेळके यांनी काल रोजी दु.1:00 वा. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी स्वतःचे आयुष्य संपवले.


 त्यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये लिहिल्याप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी श्री भगवान दराडे, प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व जिल्हाधिकारी हे कर्मचाऱ्यांच्या जिवाची कोणतीही कदर न करता वाट्टेल ते कामाचे टारगेट देऊन अगोदरच कोरोंना महामारीमध्ये जीव धोक्यात घालून आपले काम चोख पार पाडत असताना सदर कर्मचाऱ्यांस व्यक्तिकरित्या असे लक्ष करून त्यांचा जीव जाण्यास परावृत्त करत असलेचे स्पष्ट होत आहे, म्हणून संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचे वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच प्रशासनातील तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांची चौकशी करून त्यांचे वर निलंबनाची कार्यवाही करावी व यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून कठोर कार्यवाही करावी ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच संबंधीतांवर 2 दिवसात जर कार्यवाही न झाल्यास सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आक्रमक पवित्र घेतील  असं म्हणाले ,


डॉ शैलेश पवार ,डॉ संदीप गायकवाड ,अक्षय पठारे ,डॉ जयदीप काळे , डॉ संकेत पोटे

आदींसह  सर्व समुदाय आरोग्य अधिकारी नगर जिल्हा यांच्या निवेदनावर सही आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only