Wednesday, July 28, 2021

खताच्या दुकानातून झाली चोरी


 खताच्या दुकानातून झाली चोरी

नगर दिनांक 28 प्रतिनिधी 


खते बी-बियाणे यांच्या दुकानांमध्ये वस्तू दाखवा असे म्हणत असतानाच संबंधित मालकाने वस्तू आणण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात पाच जणांनी दुकानातील पंचगंगा या कंपनीचे पाचशे ग्रॅमचे 40 पॅकेट चोरून नेल्याची घटना तेथील मार्केटयार्ड परिसरामध्ये घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


मार्केट यार्ड परिसरामध्ये रासायनिक खते विक्रीचे साधना एजन्सीचे दुकान आहे याचे मालक अजय बोरा हे आहेत.


माहिती अशी की, अजय बोरा हे काल दुकानांमध्ये असताना त्यांचा मुलगा ऋषभ बोरा हा दुकानांमध्ये होता. दुकानांमध्ये ग्राहक म्हणून पाच अनोळखी इसम दुकानांमध्ये आले त्यातील दोघाजणांनी शेती उपयुक्त विविध औषधांची चौकशी करून ते दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्या ग्राहकांसाठी मागितलेले औषध हे रॅक मधून आणण्यासाठी गेला असता दोन मिनिटाच्या अंतरामध्ये हे पाच जण पंचगंगा या कंपनीचे 545 पाकीट असलेले बॉक्स उचलून घेऊन गेले, यानंतर बोरा यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिले असता यातील पाच जणांनी हे बॉक्स नेले असल्याचे दिसून आले. साधारण 40 ते 45 हजार रुपयांचा हा आहे या प्रकरणात संदर्भामध्ये अजय बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या पाच जणांविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only