Tuesday, July 27, 2021

पोलीस ठाण्यातील मुद्देमालाच्या सुरक्षिततसाठी पोलीस अधीक्षकांनी घातले लक्षपोलीस ठाण्यातील मुद्देमालाच्या सुरक्षिततसाठी पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष

नगर दिनांक 28


गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला अथवा पकडलेल्या गुन्हेगारांकडून हस्तगत केलेला ऐवज पोलीस कस्टडी मध्ये सुरक्षित रहावा, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने बँकेच्या लॉकरच्या पर्यायाचा विचार सुरू केला आहे. या बाबत सर्व प्रशासकीय बाबींचा विचार करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.


जिल्हाभरामध्ये विविध गुन्हे घडतात. गुन्हे घडल्यानंतर आणि ठिकाणी मुद्देमाल अथवा रोख रक्कम चोरीला जाते. त्यानंतर त्याचा तपास पोलीस विभाग करत असतात. एखादा आरोपी पकडल्यानंतर त्या आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला जातो. तो हस्तगत मुद्देमाल संबंधित मुद्देमाल कारकून यांच्याकडे ताब्यात असतो. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने अथवा रोख रक्कम किंवा इतर वस्तु सुद्धा असतात. मात्र, मागील काही दिवसात घडलेल्या घटनेमुळे मुद्देमाल सुरक्षित कसा राहील, याबाबत आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष घातले आहे.


पाटील म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी पदाच्या स्तरावर बँकेत लॉकर घेऊन तेथे मुद्देमाल ठेवता येईल का, या दृष्टिकोनातून विचारविनिमय सुरू करण्यात आलेला आहे. प्राथमिक स्तरावरून त्याची माहिती देण्यात आलेली आहे. सदरचा मुद्देमाल ठेवताना स्थानिक पातळीवर कोणत्या बँकेमध्ये ठेवला जावा, अथवा त्या त्या तालुक्याचा मुद्देमाल एकत्र कशा पद्धतीने ठेवता येईल,  याकरता नियमावली तयार केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only