Monday, July 26, 2021

कासार समाजातील विद्यार्थ्यांना अखेर शिष्यवृती सुरु.

 

कासार समाजातील विद्यार्थ्यांना अखेर शिष्यवृती सुरु.

अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या  अंतर्गत हुशार विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृती अखेर सुरु करण्यात आली आहे.  रविवार  दिनांक २५ जुलै रोजी अहमदनगर येथील श्रद्धा हॉटेल, सावेडी येथे  शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न  झाला.

           कासार समाजातील हुशार विद्यार्थ्यांना दिली जाणारी ही शिष्यवृत्ती अनेक  वर्षांपासून बंद पडली होती.  अखिल भारतीयचे अध्यक्ष  शरद भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करुन विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृती पुर्ववत सुरु करण्यात आली. 

        शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात पार पडला. 

       या कार्यक्रमासाठी  उपस्थित असलेले  अरुण वेळापुरे, आनंद डांगरे,राज्याचे युवा अध्यक्ष  प्रकाश दादा तवटे, गोविंद अंधारे, चंद्रकांत सरोदे, नंदकुमार शिलवंत, दिपक वनगुजर, रवींद्र शिनगारे, प्रमोद शिनगारे, मंडलेश्वर काळे, पद्मिनीताई काळे, जयंत काळे, मंगेश विभूते, नंदकुमार कोळपकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र येंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन आपले मनोगत व्यक्त करताना शिष्यवृती मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिल आष्टेकर ,  अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश रासने व अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र येंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील युवक मंडळाने अतिशय परिश्रम घेऊन  भव्यदिव्य कार्यक्रम यशस्वी करून दाखवला . 

  रमेशभाऊ रासने, सचिन कासार, पवन रासने, विशाल कडुस्कर, विशाल येंडे, शशांक रासने, अनंत रासने, अंकित रासने, अनंत रासने ,सचिन वेळापुरे, रोहीत पोफळे, अच्चुत रासने, सौरभ भांडेकर, कवित रासने,ओंकार डांगरे, प्रविण भांडेकर  व इतर अनेक कार्यकर्त्यांसह श्री कालिका देवी संस्थान चे सर्व पदाधिकारी यांनी उल्लेखनीय कार्य केले. शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची चव चाखून सर्वांनी आनंद व्यक्त केला. 

            उपस्थित सर्व मध्यवर्ती मंडळाचे सन्मानित सदस्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे सर्वांनी मनापासून कौतुक करून त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. व जीवनात खूप मोठे यश मिळवून परत समाजाची उतराई करावी अशी अपेक्षा बाळगून अनेक आशिर्वाद ही देण्यात आले. 

           या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विशाल कडुसकर यांनी केले. सत्काराची जबाबदारी युवक मंडळाचे  पदाधिकारी विशाल येंडे,शशांक रासने,अनंत रासने यांनी पार पाडली व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शशांक रासने यांनी केले. कोरोना महामारी मुळे निधन झालेल्या समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only