Thursday, July 1, 2021

वकील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिने जिल्हा न्यायालयातअटकपूर्व जामीन अर्ज. अर्जावर शुक्रवारी (2 जुलै)निकाल दिला जाणार आहे.जरे हत्याकांडातील आरोपीचा जामीन फेटाळला
अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरेयांच्या हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या पवार (प्रवरानगर) यानेजामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीशबी.एम.पाटील यांनी फेटाळला आहे.


या खून प्रकरणातील सहा आरोपींपैकी न्यायालयीनकोठडीत असलेल्या टम्या पवारने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीनअर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. पवारच्या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्रयादव पाटील व जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकरयांनी कडाडून विरोध केला. पवार याच्याबाजूने अ‍ॅड. विजय गुंदेचायांनी काम पाहिले.


रेखा जरे यांची गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्रीआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटातगळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधारबाळ ज. बोठे, टम्या पवार याच्यासह एकूण सहा आरोपी न्यायालयीनकोठडीत आहेत. यापैकी पाच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेआहे तसेच नंतर आरोपी बोठे याच्याविरुद्धही पुरवणी दोषारोप पत्र दाखल झालेआहे. त्यानंतर या आरोपींपैकी टम्या पवार याने न्यायालयात जामीनासाठी अर्जकेला होता. या अर्जावरील सुनावणीच्यावेळी सरकारी पक्ष व फिर्यादीची बाजूमांडताना सरकारी वकील अ‍ॅड. यादव पाटील व फिर्यादीचे वकील अ‍ॅड.पटेकर पटेकर यांनी,आरोपी टम्या पवारने हत्याप्रकरणातील बोठेसहइतर आरोपींशी 24 नोव्हेंबर 2020 रोजी किमान 17 वेळा मोबाईलवरून संपर्क साधलाआहे व पोलिस तपासात ही बाब निष्पन्न झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी करंजी घाटातअपघात घडवून रेखा जरे यांची हत्या करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता मात्र तोफसला. करंजी घाटात रेखा जरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न फसल्याने त्यांच्याहत्येचा पुन्हा कट रचण्यात आला. त्यात मुख्य सूत्रधार बाळ बोठे सह इतरआरोपींबरोबर टम्या पवार सहभागी होता, हे सिद्ध होते. कारण 24 नोव्हेंबर रोजीकरण्यात आलेला कट यशस्वी झाला असता तर 30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्याकरण्याची वेळ आरोपींवर आली नसती, ही बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनासआणून दिली.30 नोव्हेंबर रोजी झालेल्या रेखा जरे हत्याप्रकरणात आरोपी पवारचासहभाग स्पष्ट होत असल्याने टम्या पवारचा जामीन मंजूर करू नये अशी मागणीसरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील व फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनीन्यायालयात केली. 


आरोपींच्या वतीने बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी आरोपीटम्या पवाराचे इतर आरोपींबरोबर 24 नोव्हेंबर रोजी मोबाईलवर बोलणे झाले. मात्रत्यानंतर रेखा जरे यांची हत्या झाली त्या दिवसापर्यंत (30 नोव्हेंबर) इतर आरोपींबरोबरटम्या पवारचे एकदाही बोलणे झालेले नाही. आरोपी टम्या पवारचा याहत्याकांडाशी काहीही संबंध नाही. खोटी हकीकत रचून टम्या पवारलाहत्याकांडात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपी टम्या पवारच्या वकिलांनीन्यायालयात केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश बी.एम.पाटीलयांनी आरोपी टम्या पवारचा जामीन अर्ज फेटाळला.
--चौकट
आज अटकपूर्ववर निर्णय
जरे हत्याकांडातील आरोपी बोठे याला हैदराबादमध्येमदत करणारी वकील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिने जिल्हा न्यायालयातअटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही,असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली असून,न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या अर्जावर शुक्रवारी (2 जुलै)निकाल दिला जाणार आहे.


--

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only