Monday, July 19, 2021

बकरी ईद ची नमाज़ मशिदीत जाऊन करू नये घरात सण साजरा करावा



बकरी ईद ची नमाज़ मशिदीत जाऊन करू नये घरात सण साजरा करावा


नगर दि 19 प्रतिनिधी 

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर आज नगर शहरामध्ये कोतवाली पोलिसांनी रूटमार्च केला. बकरी ईद साजरी होत असल्याने मुळे जनतेने आपल्या घरामध्ये सण साजरा करावा असे आव्हान पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आले आहे.


बकरीईद निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी  आज सायंकाळी शहरातील झेंडीगेट ,कोठला परिसर, इदगा मैदान, भिंगार परिसर तसेच शहरातील महत्वाच्या ठिकाणी रूटमार्च काढला. सायंकाळच्या सुमाराला पोलिसांनी हा  मार्च काढला.


या अगोदर शहर हद्दीतील कोतवाली तोफखाना भिंगार कॅम्प पोलीस  हद्दीत शांतता राखावी या करता नगर शहराच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता कमिटीच्या बैठकीत घेतलेल्या होत्या.


या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी बकरीईद च्या पार्श्वभूमीवर जे शासनाने निर्बंध लावून दिलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे कोणीही  रस्त्यावर सण साजरा करू नये,आपापल्या घरामध्येच तो साजरा करावा असे आव्हान सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only