Monday, July 12, 2021

नगर जिल्ह्यात गुन्हेगारांच्या 387 टोळ्या, पोलिसांनी केले कायदेशीर कारवाईचे नियोजननगर दि 12 प्रतिनिधी-वाळू तस्करी सह चोऱ्या, घरफोड्या, दरोडे असे संघटित गुन्हे करणाऱ्या जिल्ह्यात तब्बल 387 टोळ्या असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या टोळ्यांनी त्यांचे वर्तन सुधारले नाही तर या टोळ्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई निश्चित होणार आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी दिला.


नगर जिल्हयामधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी  टु प्लस योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्याची महिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.


नगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षक  पाटील यांच्या संकल्पनेतून नगर जिल्हयात जानेवरी २०२१ पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली. या योजनेसाठी नगर जिल्हयामध्ये मालाविषयक, शरीरविषयक तसेच वाळुविषयक असे प्रकारचे गुन्हे करणारे व ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश करण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.


या योजनेची नगर जिल्हयामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधित टु प्लस योजनेसाठी लागणारी माहीती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलीस अधिक्षक पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर येथे एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची टु प्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मालाविषक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची २०११ पासूनची माहीती संकलित करण्यात आली तसेच शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची २०१५ पासुन माहीती संकलित करण्यात आली. संकलित केलेली माहीती टु प्लस पथकांमार्फत टु प्लस योजनेच्या बेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. नगर जिल्हयामध्ये जानेवरी २०२१ पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस ३८४१ ( मालाविषयक १९१४, शरीरविषयक -१९२७) आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करुन त्यांची संकलित केलेली माहीती टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.


तसेच जानेवारी २०२१ पासुन दैनंदिन अटक आरोपीमधुन नव्याने ४३७ (मालविषयक २१४, शरिरविषयक २२३) आरोपी निष्पन्न करण्यात आले असून आजपोवतो ४२७८ आरोपी वेबसाईटवर भरण्यात आले आहेत.


आरोपी मेळावे :


अहमदनगर जिल्हयामध्ये जानेवरी २०२१ पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस 4278 आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करण्यात करुन अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी, यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपींचे मेळावे घेण्यात आले व यापुढे गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास अन्य कायदेशीर कारवाईची जाणीव करून देण्यात आली.


नवे हिस्ट्रीशीट केले तयार


टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ठ असलेले मालाविषयक गुन्हे करणारे यातील प्रोफेशनल / सराईत व्यवसायिक गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हयातील ४५१ सराईत गुन्हेगारांचे नवीन हिस्ट्रीशीट उघडण्यात आले आहे. जिल्हा अभिलेखावरील जुने १६७ हिस्ट्रीशिटर्स पैकी अक्रियाशिल ८२ हिस्ट्रोशिटस कमी करण्यात आले असुन आजपावेतो नवीन व जुने असे एकुण ४५१+८५= ५३६ हिस्ट्रीशीट अहमदनगर जिल्हा अभिलेखावर क्रियाशिल आहेत. 


गुंडा रजिस्टर तयार


तसेच टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ट असलेले शरीरविषयक गुन्हे करणारे गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी नवीन ५१७ गुंडांना गुंडा रजिस्टर मध्ये सामाविष्ठ करण्यात आले असून जिल्हा अभिलेखावर जुने ९०१ गुंडापैकी अक्रियाशिल असे २०९ गुंड गुंडा रजिस्टरमधुन कमी करण्यात आले असून आजपावेतो नवीन व जुने असे एकूण ५१७ + 692 मिळून १२०९ गुंड अहमदनगर पोलिसांच्या अभिलेखावर आहेत.


 प्रतिबंधक कारवाई :


अहमदनगर जिल्हा अभिलेखावरील टु प्लस योजनेत सामाविष्ठ आरोपीविरुद्ध सीआरपीसी ११०/१०७ नुसार १४२२ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.


टू प्लस योजनेतील शरिराचे गुन्हेगारांतुन १४२ टोळया निष्पन्न करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ नुसार ऑक्टोबर २०२० पासून आजपावेतो १३ प्रस्ताव प्राप्त झाले असून ४ क्रियाशिल गुन्हेगारी टोळींना हद्दपार करण्यात आले आहे

---

चौकट


-महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ नुसार २४ प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहेत.

- महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५७ नुसार २ प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहेत.

-एमपीडीए नुसार प्रस्ताव प्राप्त असुन १ आरोपीस स्थानबद्ध करण्या

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only