Monday, July 12, 2021

गुन्हे नोंद व शोध प्रणालीमध्ये नगर जिला महाराष्ट्रात number 1
सीसीटीएनएम (CRIME AND CRIMINAL TRACKING NETWORK SYSTEM) गुन्हे नोंद व शोध प्रणालीमध्ये नगर जिला महाराष्ट्रात प्रथमनगर दि 12 प्रतिनिधी-गुन्ह्याची नोंद, आरोपींचा शोध, पुराव्यांचे संकलन, न्यायालयात दोषारोप पत्र व अनुषणगीक 42 मुद्द्यांच्या सीसीटीएनएम (CRIME AND CRIMINAL TRACKING NETWORK SYSTEM)

प्रणाली मध्ये नगर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकविला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके हे उपस्थित होते. दिनांक १५ जानेवारी २०१५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सीसीटीएनएस प्रणाली सुरु झालेली असून त्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन स्तरावरील संपूर्ण सदर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या प्रणालीमध्ये १ ते २१ फॉर्मची विभागणी केली असून त्यांना सी आय डी कडून मासिक गुण देण्याची पद्धत आहे. CES MONTHLY SUCCESS STORY + CTTIZEN SERVICES या सर्वांचे महाराष्ट्र पोलीस विभागातून गुणांकण करण्यात येते असे ते म्हणाले. या गुणांकनात मार्च व एप्रिल मध्ये नगर जिल्हा तिसरा तर मे महिन्यात राज्यात पहिला आला आहे.

माहे मे २०११ मध्ये अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शननुसार महाराष्ट्रातील एकूण ४८ युनिटमधून नगर जिल्हयाचा गुणांकणानुसार २११ गुणापैकी 1९७ गुण व 93 टक्के मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. माहे मार्च २०२१ व एप्रिल मध्ये अनुक्रमे तिसरा क्रमांक प्राप्त झालेला होता. तसेच माहे मे २०२१ मध्ये कसोशीने प्रयत्न करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे असे ते म्हणाले.


या उत्कृष्ट कामगिरीकरीता . पोलीस अधिक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक  अनिल कटके नगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालयामधील कार्यरत सीसीटीएनएस विभागाचे आर डी बावकर,  एस एस जोशी, ए के गोलवड मपोना/१४५९ आर ही  एस एस काळे , के पी दुबे , एस ए भागवत , टी एल दराडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच सर्व उप विभागीय कार्यालयातील सीसीटीएनएस अँडमीन, सर्व पोलीस स्टेशन सीसीटीएनएस अँडमीन इंजिनिअर  अंबादास शिंगे यांनी कसोशीने प्रयत्न करून संपूर्ण महाराष्ट्रात नगर जिल्हयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.


महिलाबाबत दाखल अत्याचाराच्या गुन्हयांचे वेळेत (६० दिवसाच्या आत तपास पुर्ण होइन सीसीटीएनएस प्रणाली मधे समाविष्ट होतील याकरिता गृह मंत्रालयाने दि.२४/२०१८ रोजी आयटीएसएसओ Investigation Tracking System For Sexual Offences ) पोर्टल सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तुलनात्मक तक्ता दर्शविण्यात येतो. त्याचे अनुपालन करून महिला-बालकाविरुद्ध द्वारा अत्याचाराच्या गुन्हयांचे वेळेत प्रणाली अंतर्गत दाखल करून नगर जिल्याचा तपास प्रक्रिया अग्रस्थानी आहे.

--

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only