Sunday, July 25, 2021

आजपासून जिल्ह्यात कारवाईची तीव्रता वाढविणार : एसपी मनोज पाटील

 

नगर दिनांक 25 प्रतिनिधी


गेल्या आठ दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सुद्धा आढळून आल्यामुळे उद्या  26 तारखेला नगर जिल्ह्यामध्ये कारवाई हाती घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.


नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुगणांची संख्या वाढत चाललेली आहे. या अगोदर शहरांमध्ये संख्या ही साधारण 20 ते 30 च्या दरम्यान होती. आता ही संख्या 100 च्या घरामध्ये गेलेली आहे. तर आज सर्वाधिक रुग्ण संख्या नगर जिल्ह्यामध्ये झाले असून ती एक हजाराच्या पुढे गेलेली आहे.


कोरोना काळामध्ये जे काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. बहुतांश ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे, तर काही जण नियमच पाळत नाही, अशीच उदाहरणे पाहायला मिळत आहेत. या अगोदर सुद्धा पोलीस प्रशासनाने लाखो रुपयांचा दंड वसूल केलेला आहे, एवढे होऊन देखील सुद्धा नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे उद्यापासून जिल्हा पोलीस दलाकडून विविध ठिकाणी बॅरिकेट उभारून पुन्हा कारवाई हाती घेतली जाणार आहे. आज नगर शहरामध्ये काही ठिकाणी कारवाई मोहीम हाती घेतली होती. उद्यापासून नगर जिल्ह्यामध्ये धडक कारवाई सुरू करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only