Saturday, July 31, 2021

विरोधी पक्ष आहेत. ते मोकळे आहेत. मोकळे असल्याने डोक रिकामं असतं. त्यामुळे असे आरोप करत असतात.शिवसेना खासदार संजय राऊत नगर दि 31 प्रतिनिधी 

मंत्र्यांचे दौरे झाले मात्र दुष्काळामध्ये मदत मिळत नाही असा आरोप विरोधकांकडून होत असलेला आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोडून काढला. विरोधी पक्ष आहेत. ते मोकळे आहेत. मोकळे असल्याने डोक रिकामं असतं. त्यामुळे असे आरोप करत असतात. त्यांनीही सरकार चालवलं, शासन चालवलंय. आमची विनंती आहे पंतप्रधानांनी यावे, हेलिकॉप्टर मधून घिरटी मारावी, आणि गुजरातचा दिले तसे महाराष्ट्राला एक हजार कोटी ताबडतोब द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक पूरग्रस्तच्या खात्यात दहा हजार रुपयांची मदत जमा होणार आहे आणि त्याहीनंतर पुढे मदत दिली जाणार आहे, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.


सोनई येथील ऑक्सीजन प्लांट उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. खासदार संजय राऊत म्हणाले की, 

हा महाराष्ट्र आहे. भाजपने सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. प्रयत्न करून थकलेत. डोकं आपटून झालेल आहे. मात्र डोकं फुटलं भिंत अजूनही तशीच आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. ईडीमार्फत सुरु असलेल्या करवायांवर प्रतिक्रिया दिली. एकदा सूडबुद्धीने कारवाई करायची म्हटल्यावर पाच काय पन्नास वेळा समन्स पाठवतील. राजकारण कोणत्या थराला गेलेला आहे? हे सध्या आपण पाहतो, असेही ते म्हणाले.


शिवसेनेने राज्यभरामध्ये शिवसंपर्क अभियान सुरू केलेले आहे. गावा-गावापर्यंत हे अभियान पोहोचले असून, येथे सुद्धा मंत्री शंकर गडाख यांनी अभियान राबविले. या अभियानाची आता सर्वत्र सांगता होत आहे. या ठिकाणी अभियानाला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर सुद्धा आहेत. राज्यात जरी सरकार असले, तरी पक्षाचा संघटना ही मजबूत असायला पाहिजे. या जिल्ह्यांमध्ये शंकराव गडाख आल्यापासून पक्ष वाढण्यास सुरुवात झालेली आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा बळ मिळत आहे. नगर जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावा, अशी भूमिका मी मांडली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारमध्ये तिन्ही पक्ष काम करत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी समन्वयाबाबत मागे एक वक्तव्य केलेले आहे, ते समर्पक आहे. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तीन पक्ष एकत्र सरकार चालविणर असा निर्णय झालेला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी शिवसेना-भाजप युती असताना त्यावेळेला सुद्धा आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यावेळी सुद्धा आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठीचे काम सुरू ठवलं होतं. तेव्हाही शतप्रतिशतचे नारे होतच होते, असेही ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. 


पुन्हा येईल पुन्हा येईल असं म्हणणाऱ्यांना त्यांचे सरकार परत येईल, असं वाटत आहे, याबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, आत्तापर्यंत सरकार व्यवस्थित चाललेलं आहे. यापुढेही सरकार व्यवस्थित चालेल. दुसरा कोणी यायचा प्रश्नच नाही. भविष्यात सुद्धा अशीच परिस्थिती कायम राहील, असे ते म्हणाले.


माजी व आजी मुख्यमंत्री एकत्र काल कानामध्ये बोलले, त्यावर विचारले असता खासदार राऊत म्हणाले की, ते कानात बोलले आहेत. भिंतीला कान नसतात. आपण संसदीय लोकशाही व्यवस्थित काम करतो. यात विरोधी पक्षाला नेहमी महत्त्व मोठे असते. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये संवाद असायला हवा. विरोधी पक्ष विधायक पद्धतीने काम करत असेल, तर त्याचा फायदा राज्याला आणि देशालाही होतो. विरोधी पक्षातही ऐकलं पाहिजे या मताचा मी आहे. सरकार पडायच्या चर्चा या लांडगा आला रे आला, अशा आहेत. मात्र लांडगा काही येत नाही. जे बोलताहेत त्यांना बोलू द्या, तेवढच त्यांचा वेळ जातोय त्यामध्ये जाऊद्या, असा टोलाही त्यांनी पुन्हा लगावला.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only