Saturday, July 10, 2021

शिर्डी येथे बांधकाम मजूराची हत्या करणारे आरोपी जेरबंदशिर्डी येथे बांधकाम मजूराची हत्या करणारे आरोपी जेरबंद


। नगर । दि.10 जुलै । शिर्डी येथे बांधकाम मजूराची हत्या करणारे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.


दि. 29 जुन रोजी सायंकाळी फिर्यादी संजय मधूकर पवार (वय- 41 वर्षे , धंदा- सेन्ट्रींग मजूरी , रा . राजगुरुनगर , शिर्डी , ता . राहाता ) हे त्यांचे मामाचा मुलगा राजेन्द्र आंतवन धिवर (रा.राजगुरुनगर, शिडी) असे दोघे राहाता येथील मजूरीचे काम संपवून सायकलवरुन घरी जात असताना.


सायंकाळी 7/30 वा . चे सुमारास सायकल चालवून थकल्यामूळे राहाता - शिर्डी रोडवरील निसर्ग हॉटेल जवळ मोकळ्या जागेत बसलेले असताना दोन मोटार सायकलवरुन चार अनोळखी मुले त्यांचेजवळ आले व मोटार सायकली रस्त्याचे कडेला उभ्या करुन फिर्यादी व राजेन्द्र धिवर यांचेकडे येवून माचीस मागीतली.


त्यावेळी राजेन्द्र धिवर याने त्याचे जवळील पिशवीमधून माचीस काढून सायकलचे सिटवर ठेवून सदर अनोळखी मुलांना घेण्यास सांगीतले. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील कोणत्यातरी धारदार हत्याराने राजेन्द्र आंतवन धिवर याचे डोक्यावर, पोटावर वार करण्यास सुरुवात केली.


त्यावेळी सदर आरोपी हे फिर्यादी यांना देखील  याला देखील पकडा व मारा  असे म्हणाल्याने फिर्यादी तेथून पळून गेले . सदर चार अनोळखी इसम हे राजेन्द्र धिवर याची हत्या करुन मोटार सायकलवरुन पळून गेले. सदर घटनेबाबत शिर्डी पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only