Tuesday, July 6, 2021

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्यापाथर्डी सा. वा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके वय 36 यांनी आज मंगळवार  दुपारी १ च्या दरम्यान उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शेळके यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे,तहसीलदार व जिल्हाधिकारी हे आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.या  घटनेने तालुक्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या बाबद अधिक माहिती अशी कि  डॉ. गणेश  शेळके हे आज उपकेंद्रात नेहमी प्रमाणे आले व  काही वेळाने त्यांनी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  तिसगावला बोलावले आहे असे सांगुन ते तिसगावला गेले व काही वेळाने परत आले. ते परतले त्या वेळी तणावाखाली असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्या नंतर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत सुद्धा काढली. या नंतर  शेळके हे पेन व कागद घेउन आले व टॅब जमा करा मी राजीनामा देणार आहे असे सांगत ते उपकेंद्रातील दुसऱ्या खोली मध्ये गेले व त्यांनी आतून दरवाजा लावुन घेतला. काही वेळाने आरोग्य सेविकेने जेवनासाठी डॉक्टरला बाहेरून आवाज दिला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. या नंतर त्यांना मोबाइल केला मात्र तो शेळके यांनी न उचलल्याने आरोग्य सेविकेने खिडकीतुन पाहीले असता  डॉ . शेळके यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती आरोग्य सेविकेने तात्काळ आपले वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कळवल्या नंतर तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून डॉ. शेळके यांचा मृतदेह काढला. या वेळी डॉ. शेळके यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्या मध्ये शेळके यांनी 

आपल्या आत्महत्येस  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे हे जबाबदार असुन प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण तसेच वेळत पगार नाही व पगार कपातीची धमकी यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहुन ठेवले होते. उत्तरणीय तपासणीसाठी शेळके यांचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. सोबत पासपोर्ट

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only